Pik Karj Yojana
Pik Karj Yojana sakal

Pik Karj Yojana : शून्य टक्के पीककर्ज योजनेचा खेळखंडोबा

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान निम्म्या शेतकऱ्यांनाच मिळाले आहे. त्यात भर म्हणून शून्य टक्क्याने पीककर्ज योजनाही सरकारकडून निधीअभावी रखडली आहे.
Published on

Pik Karj Yojana - वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ''शून्य टक्क्याने पीककर्ज'' देण्याची योजना केंद्र व राज्यसरकारने संयुक्तरित्या राबविली. मात्र, गेली दोन वर्षे शेतकऱ्यांच्या व्याजाचा परतावा सरकारी यंत्रणेकडून मिळाला नाही. कर्जमुक्ती योजनेपाठोपाठ शून्य टक्क्याच्या योजनेचाही खेळखंडोबा लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Pik Karj Yojana
Mumbai : महिला लोकल डब्यात सकाळी गस्त वाढवा; चित्रा वाघ यांची रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान निम्म्या शेतकऱ्यांनाच मिळाले आहे. त्यात भर म्हणून शून्य टक्क्याने पीककर्ज योजनाही सरकारकडून निधीअभावी रखडली आहे. जिल्हा बँका सोसायट्यांमार्फत सहा टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अल्पमुदत कर्जाचा पुरवठा करतात. तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्क्यांनी कर्जपुरवठा करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला.

Pik Karj Yojana
Mumbai : देवेंद्र फडणवीस साहेब आपले स्वागत ,येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेवून या ...

निर्धारित वेळेत कर्जरक्कम भरायची आहे. त्यानंतर तीन टक्के केंद्रसरकारकडून तर तीन टक्के व्याज राज्यसरकारकडून परतावा म्हणून येते. खरीप हंगामापर्यंतच्या व्याजाचा सरकारकडून २०२०-२१ चा परतावाही आला आहे. परंतु २०२१-२२ चा खरीप व रब्बी तर २०२२-२३ चा खरीप अशा दोन वर्षातील चार हंगामाच्या कर्जांचा परतावा मिळालेला नाही. यामुळे नव्या पीककर्ज उचलीवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे.

शेतकऱ्यांनी शून्य टक्क्यांच्या आशेपायी उसनेपासने करून किंवा व्याजाने उचलून बँकेत पैसे भरले होते. गेली दोन वर्ष व्याजपरतावा न मिळाल्याने ते सोसायटीकडे, बँकेकडे संताप व्यक्त करत आहेत.
- प्रमोद पानसरे, संचालक, अजित सोसायटी, कोऱ्हाळे (ता. बारामती)

Pik Karj Yojana
Mumbai : देवेंद्र फडणवीस साहेब आपले स्वागत ,येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेवून या ...

सध्या भांडवलाची गरज असल्याने दोन्ही वर्षांचा पीककर्जाचा परतावा त्वरित मिळावा तसेच गाय गोठा योजनेतील व्याजपरतावाही मिळाला नाही.
- मिलिंद कांबळे, शेतकरी, होळ (ता. बारामती)

Pik Karj Yojana
Pune : शेतक-यांचे सोयाबीन, गहु चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलीसांना यश; दोघांना अटक

सोसायटीला चार टक्क्यांनी पीककर्ज दिले जाते. सभासदांना सहा टक्क्यांनी कर्जपुरवठा करते. ३१ मार्चला कर्ज व्याजासह भरून घेतो आणि त्यानंतर शासनाकडून रकमा आल्यावर सभासदांच्या खात्यावर व्याजपरतावा पाठविला जातो.

मागील वर्षाचा व्याजपरतावा जूनमध्ये मिळेल, असे सांगण्यात आले होते. तो मिळालेले नाहीत. सध्या पाठपुरावा सुरू आहे. महाराष्ट्राचाच हा प्रश्न असून हे कर्ज शून्य नव्हे तर सहा टक्क्यांचे ठरले आहे.
- डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा बँक

Pik Karj Yojana
Mumbai : महिला लोकल डब्यात सकाळी गस्त वाढवा; चित्रा वाघ यांची रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी


मार्च अखेर ५७ कोटींचे वितरण
पंजाबराव देशमुख व्याजपरतावा योजनेअंतर्गत बँकांकडून सहायक निबंधक कार्यालयामार्फत आलेले प्रस्ताव मार्गी लावले आहेत. माझ्याकडे एकही प्रस्ताव पेंडिंग नाही.

मार्चअखेर व्याज परतावा म्हणून २ लाख २८ हजार ६६३ शेतकऱ्यांना ५७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अलीकडच्या दोन वर्षांतील व्याजपरताव्याचे प्रस्ताव मात्र शिल्लक आहेत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.