mendpal
mendpal sakal

Drought News : दुष्काळाच्या झळांमुळे मेंढपाळ हवालदिल

१९७२च्या दुष्काळापेक्षाही भयंकर दुष्काळ पडतोय की काय असे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
Published on

शेटफळगढे - दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्याने मेंढपाळ व्यवसाय करणारे मेंढपाळ पावसाच्या शेवटच्या आशेवर डोळे लावून बसले आहेत. मेंढपाळ राज्यभर आपल्या मेंढ्या घेऊन फिरत असतात. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्याच्या तोंडावर ते परतीचा प्रवास करून गावाकडे येत असतात. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन तीन महिने लोटले तरी समाधानकारक पाऊस न आल्याने मेंढपाळ अद्याप आपल्या गावाकडे पोहोचलेच नसल्याचे चित्र आहे.

निरगुडे (ता. इंदापूर) परिसरात असेच मेंढपाळ व्यवसाय करणारे मेंढपाळ आपली मेंढरे घेऊन आले आहेत. बहुतांशी मेंढपाळ ग्रुपने मेंढ्या घेऊन चाऱ्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत असतो. शेतातील पिके निघाल्यानंतर मेंढ्या चारण्यासाठी मेंढपाळ आल्याचे चित्र दरवर्षी दिसत असते. यंदा मात्र पावसाळ्यातही भटकंती करावी लागत आहे. केवळ चाऱ्यासाठीच नव्हे तर पाण्यासाठी सुद्धा मेंढ्यांना घेऊन फिरावे लागत आहे. पाण्याचा आसरा बघूनच मेंढपाळांचा मुक्काम दिसून येत आहे.

बाराही महिने भटकंतीची वेळ
लहान लहान पोराबाळांसोबत आपला संसार व आपल्या मेंढ्यांवर उपजीविका अवलंबून असल्याने पशुधनाची मोठ्या काळजीने राखण करतात. पावसाळ्यातील चार महिने मेंढपाळ आपल्या गावी राहिल्यानंतर मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी स्थलांतरित होत असतात. यंदा मात्र बाराही महिने भटकंतीची वेळ त्यांच्यावर आली आहे.

mendpal
Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील निजामशाहीत ५२ नव्हे तर ५८ गावे

१९७२च्या दुष्काळापेक्षाही भयंकर दुष्काळ पडतोय की काय असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. आता केवळ गणपती आणि घटस्थापनेचे दिवस एवढाच पावसाळा राहिला आहे. या काळात पाऊस जर नाही झाला तर मात्र मेंढ्यांचे काही खरे नाही त्यांना टेम्पो भरून कोकणात घेऊन जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्यायच शिल्लक राहिला नाही
- खंडू कारांडे मेंढपाळ, पाटस

mendpal
Pune News : गृहनिर्माण सोसायटीमध्येही स्थापन होणार तंटामुक्ती समिती : उपनिबंधक संजय राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()