शिरूर आक्षेपार्ह मजकूर

शिरूर आक्षेपार्ह मजकूर

Published on

चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
शिरूर, ता. ११ : इन्स्टाग्राम अकाऊंटवर औरंगजेबाचा फोटो व आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या तरुणासह इतर चार अल्पवयीन मुलांवर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक वातावरण बिघडू नये, म्हणून शहराच्या विविध भागात पोलिस बंदोबस्त लावला आहे.
रेहान असिफ काझी याच्यासह चार अल्पवयीन मुलांवर (सर्व रा. शिरूर) गुन्हा दाखल केल्यानंतर काल रात्री त्यांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, काझी याला नोटीस बजावून मुक्त केले असून, इतर अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन ही मुले त्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. औरंगजेबाचा फोटो व त्याखाली आक्षेपार्ह मजकूर इन्स्टाग्रामवर ठेवल्याचा प्रकार पाच जून ते नऊ जून या काळात घडला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी सखोल चौकशी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकारानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व सामाजिक तेढ वाढू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविला असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.