शिरूर परिसरात सर्जा-राजाला पुरणपोळी

शिरूर परिसरात सर्जा-राजाला पुरणपोळी

Published on

शिरूर, ता. १५ : शिरूर परिसराबरोबरच अण्णापूर, रांजणगाव गणपती येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. आपल्या जीवाभावाच्या या सख्याला, सर्जा - राजाच्या जोडीला पुरणपोळी खाऊ घालून, त्याचे हळदी - कुंकवाने औक्षण करून गुलाल - भंडार ची मुक्त उधळण करीत ठिकठिकाणी वाद्यांच्या गजरात मिरवणूका काढण्यात आल्या.
रांजणगाव गणपती, अण्णापूर या गावांत बैलगाडा शौकीन मोठ्या प्रमाणात असून, त्यांनी खिलार बैल जपले व जोपासले आहेत. रांजणगावात अनेक कुटूंबांनी प्रेमाने व आत्मियतेने बैलांची जपणूक केली आहे. शनिवारी बैलपोळ्यानिमीत्त, गावात व वाड्या वस्त्यांवर बैलांना सजवून मिरवणूका काढण्यात आल्या.
ग्रामदैवत मारूती मंदिरासमोर बैलांना आणल्यानंतर, भंडार - गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. आंबेगाव - शिरूर मतदार संघाचे राष्ट्रवादी चे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, सरपंच सर्जेराव खेडकर, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे सचिव तुषार पाचुंदकर, पुणे जिल्हा बैलगाडा मालक संघटनेचे कार्याध्यक्ष संपत खेडकर, नामदेव पाचुंदकर, उमेश पाचुंदकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. दरम्यान, अण्णापूर येथे बैलांची वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. गोलेगाव येथे बैलपोळ्यानिमीत्त, ग्रामपंचायत सदस्य मयुर बोऱ्हाडे यांच्या पुढाकारातून मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
03061

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()