पर्यटकांची गर्दी ; कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी खोऱ्यातील डोंगरांनी शालू पांघरला वर्षाविहारांसाठी नैसर्गिक सौदर्य पर्वणीच
ओतूर, ता. ३० ः जुन्नर तालुक्यातील उंच डोंगर शिखरावर वसलेल्या कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी खोऱ्यात सध्या डोंगर दऱ्यांनी हिरवा शालू परिधान केला आहे. डोंगरावरून हजारो फूट खोल दरीत मांडवी नदीत पडणारे धबधबे पाहून मन रोमांचित होत आहे. वर्षाविहार करणाऱ्या पर्यटकांसाठी हा परिसर म्हणजे नैसर्गिक सौदर्यांची पर्वणीच आहे.
कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभूळशी व इतर वाड्यावस्त्यांवर अंदाजे पंधरा हजारांपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांची वस्ती असून या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील मुथाळणे घाट, मांडवे घाट, जांभूळशी घाट, कोपरे मार्ग या सर्व परिसरात नैसर्गिक सौदर्यांची मुक्त उधळणच सुरू आहे. डोंगर माथ्यावरून फेसाळत कोसळणारे धबधबे, भात खाचरातील पाण्याचे छोटे-छोटे धबधबे या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य खुलवीत असून पर्यटकांना वर्षाविहारासाठी आकर्षित करत आहे.
विशेष करून मुथाळणे घाटा सुरू झाला की, थोडे पुढे छोटे-मोठे धबधबे कुटुंबासह आनंद घेण्यासाठी सुंदर व सुरक्षित दिसून येतात. संपूर्ण घाटात वाघोबा मंदिरापर्यंत पाच-सहा धबधबे आहेत. तसेच मांडवे घाटातील धबधबे व या मार्गावरून दिसणारे सौंदर्य आणि जांभूळशी गावाला जाताना लागणाऱ्या डोंगर दऱ्यातून पडणारे धबधबे व निसर्गसौंदर्य मनमोहन टाकते. तसेच कोपरे मार्गावरून मांडवी नदीत हजारो फूट खोल पडताना दिसणारे धबधबे जसे की डोंगरांनी हिरव्या शालू परिधान केला आहे, असे दिसत आहे. तर मुथाळणे गावातून येसठाव धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर ही निसर्गाची मुक्त उधळण झालेली दिसून येते. एकूणच या संपूर्ण परिसर वर्षाविहारासाठी पर्यटकांसाठी ही एक पर्वणीच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.