बनकर फाटा येथे महिलांनी भरवली न्याहरी

बनकर फाटा येथे महिलांनी भरवली न्याहरी

Published on

ओतूर, ता. २७ : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आक्रोश मोर्चाचे बनकर फाटा (ता. जुन्नर) येथे परीसरातील शेतकरी, महिला व नागरिकांनी स्वागत केले. या वेळी शेतकरी महिलांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना कांदा, चटणी व भाकरीची न्याहारी भरवली. तसेच, महिलांनी कांद्याने भरलेली टोकरी देऊन केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून कांद्याचे बाजारभाव पाडल्याचा निषेध केला.
माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले, माजी पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, विद्या निकेतन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सरपंच सचिन आंबडेकर, धनंजय बटवाल, प्रमिला शिंदे, महात्मा फुले पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंदे, उदापूर सोसायटी अध्यक्ष संजय बुगदे, उद्योजक रोहिदास शिंदे यांनी स्वागत केले.

ओतूरमध्ये केंद्र सरकारचा निषेध
ओतूर येथील मोनिका चौकात माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, संभाजी तांबे, प्रमोद ढमाले, बबन तांबे व इतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी कोल्हे यांना कांद्याची माळ व भाजीपाला भेट देऊन केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. त्यानंतर कोल्हे यांची ओतूर शहरातून बैलगाडीत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीसमोर विघ्नहर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे व माजी सरपंच गंगाराम डुंबरे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत निवेदन देऊन निषेध नोंदवला. जुने बसस्थानक परिसरात छोटी कोपरा सभा घेण्यात आली. तेथे संभाजी तांबे व तुषार थोरात यांनी मनोगत व्यक्त करून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व्यक्त करून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच, खासदार कोल्हे व सुप्रिया सुळे यांच्या निलंबनाचा निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.