गोमांस वाहतूकप्रकरणी 
ओतूरमध्ये एकाला अटक

गोमांस वाहतूकप्रकरणी ओतूरमध्ये एकाला अटक

Published on

ओतूर, ता. १० : गोमांस वाहतूकप्रकरणी येथील पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून अटक केली असून, एक गाडीही गोमांसासह जप्त केला. नासिर महम्मद शेख (वय ३८, रा. कोल्हेवाडी रस्ता, संगमनेर, जि. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्या ताब्यातील मारुती सुपर कॅरी वाहन (क्र. एमएच १२ क्यूडब्ल्यू २८७१) अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार व १५०० किलो जनावरांचे मांस अंदाजे किंमत ३ लाख रुपये ताब्यात घेतल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.
याबाबत ओतूर पोलिसात ऋषिकेश मल्हारी शेलार (वय २५, रा. ओतूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत ठाणे अंमलदार बाळशीराम भवारी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आठ वाजेदरम्यान नगर- कल्याण महामार्गावर कोळवाडी येथे गोरक्षक तरुण व कोळवाडी ग्रामस्थ यांनी शंका आल्याने पांढऱ्या रंगाचे मारुती सुपर कॅरी वाहन थांबवले आणि पाहणी केली असता भाजीपाल्याच्या पिशव्यांच्या मागे बेकायदेशीररीत्या कत्तल केलेल्या जनावरांचे मुंडके, अर्धवट तुटलेले पाय व इतर मांस आढळून आले. त्यानंतर नागरिकांनी पोलीसांना खबर दिली. ओतूर पोलिसांनी नासिर शेख व वाहन आणि त्यातील सर्व मांस ताब्यात घेतले. या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.