शिवनेरीच्या पायथ्याशी आज वारकरी संत साहित्य संमेलन

शिवनेरीच्या पायथ्याशी आज वारकरी संत साहित्य संमेलन

Published on

ओतूर, ता. १६ : कुसूर (ता. जुन्नर) येथे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या दत्त मंदिराच्या सभागृहात शुक्रवारी (ता. १७) जिल्हास्तरीय वारकरी संत साहित्य संमेलन आयोजित केल्याची माहिती जुन्नर तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम महाराज डुंबरे आणि उपाध्यक्ष प्रकाश नवले यांनी दिली.
यावेळी सकाळी दिंडी सोहळा, मूर्ती पूजन, उद्‍घाटन, दीपप्रज्वलन, प्रमुख पाहुण्यांचा सन्मान, प्रास्ताविक, मार्गदर्शन, भोजन, दुपारी तीन ते चार या वेळेत हभप लताताई पाडेकर यांचे पुणे जिल्ह्यातील संत परंपरा या विषयावर प्रवचन होइल. त्यानंतर हरिपाठ आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होइल.
संमेलनाचे उद्‍घाटन आमदार अतुल बेनके, राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष माधव महाराज शिवणीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कुसूर येथील दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू भगत, उपाध्यक्ष विकास दुराफे, वारकरी साहित्य परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब महाराज हांडे, महिला अध्यक्ष सविता गवते, जुन्नर तालुका महिला अध्यक्ष मीना दुराफे उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.