कोऱ्हाळे येथे दूध दरवाढीसाठी उपोषण
वडगाव निंबाळकर, ता. १६ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता.बारामती) परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला वाढीव दर तसेच हमीभाव मिळावा, या मागणीसाठी गुरुवारपासून (ता.१६)साखळी उपोषण सुरू केले आहे.
तरडोली येथे सागर पंढरीनाथ जाधव यांनी दूध दरवाढीसाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोऱ्हाळे येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. यामध्ये कोऱ्हाळे खुर्द, थोपटेवाडी, लाटे, बजरंगवाडी, शिरष्णे, कुरणेवाडी, वडगाव निंबाळकर, मुढाळे, सायंबाची वाडी, लोणी भापकर, जळकेवाडी, महांगरेवाडी या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने साखळी उपोषणात सहभाग घेतला आहे.
जनावरांना अल्पदरात विमा कवच मिळावे, दुधाला वाढीव दर आणि हमीभाव मिळावा, भेसळीविरोधात पथके निर्माण करावीत, पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गुणवत्ता व किमतीवर शासनाचे नियंत्रण असावे, जनावरांची औषधे, चारा, बियाणे मुबलक व त्यावर अनुदान मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशा मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू केले आहे. यावर तोडगा न निघाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
पहिल्याच दिवशी पाचशे तरुणांचा पाठिंबा
दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रुप तयार केला आहे. यावर साखळी उपोषणासाठी केलेल्या आवाहनाला तरुणांनी उदंड प्रतिसाद देत सहभाग नोंदवला आहे. पहिल्याच दिवशी पाचशे तरुणांनी आंदोलनस्थळी येऊन आपला पाठिंबा दिला.
02164
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.