Maharashtra Farmer Success Story
Maharashtra Farmer Success Story

Farmer Success Story : या मिरचीला आठवड्याला मिळतेय ३० हजारांची पट्टी; यशोगाथा वाचा

Maharashtra Chilli Farmer's Success Story : यवत (ता. दौंड) येथील पांडुरंग तुकाराम लकडे यांनी केवळ अर्ध्या एकरात ‘तलवार’ वाणाच्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
Published on

यवत : यवत (ता. दौंड) येथील पांडुरंग तुकाराम लकडे यांनी केवळ अर्ध्या एकरात ‘तलवार’ वाणाच्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांना सध्या प्रत्येक तोड्याला सुमारे एक टनाचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आठवड्याची पट्टी ३० हजार रुपयांपर्यंत मिळते. सध्या मिळत असलेल्या चांगल्या बाजारभावामुळे तिखट मिरचीमुळे यंदाची दिवाळी गोड होणार आहे, अशी भावना लकडे कुटुंबीयांकडून व्यक्त होत आहे.

पांडुरंग लकडे यांचे कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून प्रामुख्याने तरकारीची पिके घेतात. यात टोमॅटो, काकडी, वांगे, फ्लॉवर, झेंडू, काकडी आदी वेगवेगळी पिके असतात. दरवर्षी कुटुंबाला कधी समाधानकारक तर कधी भरपूर उत्पादन मिळत असते. कुटुंबातील सर्वच सदस्य हे काम आवडीने करत असल्याने चांगले उत्पन्न आणि घरात समाधान नांदते, असे लकडे यांनी सांगितले.

यामुळे बहरली जोमदार मिरची
* उत्तम मशागत
* नेमक्या पद्धतीने सेंद्रिय खतांचा वापर
* पाणी देण्याची शास्त्रीय पद्धत
* हवामानाची मिळालेली साथ

Maharashtra Farmer Success Story
Success Story: स्पर्धा परीक्षेमध्ये हिरमोड; शेतीत वरचढ! तरुणाने सिमला मिरचीतून 4 महिन्यात घेतले 10 लाखांचे उत्पन्न

हवामान मानवल्यामुळे चांगले उत्पन्न
मागील महिन्यात सततच्या पावसाने अनेक पिकांचे नुकसान झाले. मात्र आमची मिरचीला तेव्हा नुकतीच बहरण्यास सुरुवात झाली होती. पावसाची उघडीप होईपर्यंच मिरची तोडण्याच्या मापात आली. हवामान मिरचीला मानवल्यामुळे पहिल्या तोड्यापासूनच मिरचीचे चांगले उत्पन्न मिळू लागले, असे जनार्दन तसेच दीपक लकडे यांनी सांगितले.

Maharashtra Farmer Success Story
Narishakti Success Story: आजीच्या हातची चव पोहचली जगभरात; दोन बहिणींनी 5 लाखात सुरु केला व्यवसाय, आज आहे 10 कोटींचा ब्रँड

काळ्या आईच्या सेवेसाठी नवी पिढी जोमाने काम करताना पाहून जुन्या पिढीच्या मनाला मोठे समाधान वाटते. माझी जनार्दन व दीपक ही मुले आणि सुना स्वाती व वैशाली हे सर्वजण मनापासून शेती करतात. नव्या पिढीचा नोकरी आणि व्यवसायाकडे कल असल्याची स्थिती असताना कुटुंबातील सर्वच सदस्य मनापासून शेती करतात, ही समाधानकारक बाब आहे.
- पांडुरंग लकडे, शेतकरी


शेती हा शाश्‍वत व्यवसाय आहे. वाडवडिलींनी जपलेली शेती आपल्या जगण्याचे सर्वात उत्तम साधन आहे. शेतीत प्रेमाने राबलो तर ती आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. यावर आमच्या कुटुंबाचा विश्वास आहे आणि शेतीच आम्हाला भरभरून धनधान्य देत आहे.
- स्वाती लकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.