केतकी माटेगावकरचा संगीत अल्बम लवकरच...
पुणे :(Pune News) गायन व अभिनय क्षेत्रात अगदी तरुण वयात आपले स्थान निर्माण करणारी पुण्याची युवा कलाकार केतकी माटेगावकर हिने आता संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. केतकीने संगीत दिग्दर्शन केलेला ‘माई’ हा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केतकीने या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. (music album 'Mai' is coming soon Ketaki mategaonkar made the official announcement at a press conference)
केतकीची आई व प्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर, वडील पराग माटेगावकर यावेळी उपस्थित होते. या अल्बमविषयी केतकी म्हणाली, ‘‘संगीतकार म्हणून माझा हा पहिलाच अल्बम आहे. असे असतानाही महालक्ष्मी अय्यर, शंकर महादेवन, सुरेश वाडकर आणि माझे गुरू पं. रघुनंदन पणशीकर व आई सुवर्णा माटेगावकर या दिग्गज कलाकारांनी या अल्बममधील रचनांना आवाज दिला आहे. पहिल्याच प्रयत्नावर इतक्या लोकप्रिय आणि जागतिक कीर्तीच्या गायकांनी विश्वास टाकला, हे माझ्यासाठी खूप विशेष आहे.’’ हा अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीला येत असून यामध्ये दोन भागांत एकूण नऊ गाणी असतील. केतकीची पणजी माई यांच्या रचना यामध्ये संगीतबद्ध केल्या असून धार्मिक, भक्तीमय भाव हे याचे वैशिष्ट्य आहे. लवकरच केतकी माटेगावकर या अधिकृत युट्यूब चॅनलसह विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे ही गाणी रसिकांना अनुभवता येणार आहेत. (first album of ketaki mategaonkar as a musician)
‘महिला संगीतकार उदयास याव्यात’
संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, मीना खाडीलकर, उषा खन्ना आणि अलीकडच्या काळात वैशाली सामंत या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला संगीतकार डोळ्यासमोर येतात. हे चित्र बदलावे आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी काही प्रमाणात तरी संगीत दिग्दर्शन क्षेत्राकडे वळावे, असे मला मनापासून वाटते. महिला संगीतकारांच्या चांगल्या रचनादेखील रसिकांच्या पसंतीस उतरतील, अशी अपेक्षा केतकीने व्यक्त केली.(Women musicians should emerge)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.