pune pmc
pune pmcsakal

पुणे महापालिकेला करातून विक्रमी उत्पन्न

महापालिकेच्या मिळकतकर विभागाने यंदा नऊ महिन्यांत विक्रमी उत्पन्न मिळवले
Published on

पुणे : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने यंदा नऊ महिन्यांत विक्रमी उत्पन्न मिळवले. त्यात सर्वाधिक हातभार हा हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी लावला असून, नऊ महिन्यांत तब्बल २०१.३ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत. तसेच, सर्वाधिक कमी २९.५७ कोटींचा महसूल भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातून जमा झाला आहे.(Pune Municipal Corporation has a record income from taxes)

pune pmc
Latest News : शरद पवारांचा यवतमाळ, वर्धा जिल्हा दौरा रद्द

शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांवरील कर मिळकतकर विभागाकडून वसूल केला जातो. शहरातील नवे बांधकामे वाढत असताना या विभागाच्या कामाची व्याप्तीही वाढत आहे, त्यामुळे हा विभाग महापालिकेसाठी उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहे. २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात प्रथम नऊ महिन्यातच सात लाख ८१ हजार ७२२ मिळकतधारकांकडून १३०३ कोटी ८८ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रमी उत्पन्न मिळाले. महापालिका क्षेत्रातील ४७ हजार ५३७ नवीन मिळकतींची नव्याने आकारणी केल्यामुळे सुमारे ३३४ कोटींची नव्याने मागणी निर्माण झालेली आहे. शहरातील २४ संकलन केंद्रातून मिळकतकर जमा झाला आहे. सध्याच्या कोरोनाच्या साथीने लोकांचा दूरस्थपणे आणि सुरक्षितपणे पेमेंट करण्यावर भर दिला आहे.

pune pmc
धामणीत शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

सुमारे ६९ टक्के नागरिकांनी डिजिटल पेमेंटद्वारे आणि सुमारे २१ टक्के नागरिकांनी रोख स्वरूपात, १० टक्के नागरिकांनी धनादेशाद्वारे मिळकतकर भरला आहे. कुठल्याही शहराचा विकास हा त्या शहरातून सुलभ पद्धतीने कर जमा होणे व योग्य कर आकारणीवर अवलंबून असतो. यामुळे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच मिळकतधारांना वेळेवर मिळकत कराची देयके देणे, मिळकतकर सवलतीने भरण्यासाठी आव्हान करणे, दूरध्वनीवर संपर्क साधणे, ईमेल या सारख्या विविध उपाययोजना केल्याचे सह महापालिका आयुक्त विलास कानडे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायद्यांतर्गत मिळकतकर रहिवासी घर, कार्यालय इमारत, कारखाना इमारत, गोडाऊन, दुकान, सदनिका, मोकळी जागा इत्यादी मालमत्तेवर मिळकतकर आकारू शकते.(Pune News)

pune pmc
वाकड : १४४ वाहनांना १ लाख ३५ हजार दंड आकारला

‘‘नागरिकांना वेळोवेळी सवलत देऊनही वर्षानुवर्षे कर चुकवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. यापुढेही मिळकतकर चुकवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.’’
- विलास कानडे, सह महापालिका आयुक्त

pune pmc
खेळाडूंना एका वर्षाच्या कामगिरीवर मिळणार शिष्यवृत्ती

नऊ महिन्यांतील मिळकतकराचे उत्पन्न (कोटींमध्ये)
२०१८-१९ : ९७०
२०१९-२० : १०९३
२०२०-२१ : १३००
२०२१-२२ : १३०३

विविध मालमत्तेवर मिळकतकर (कोटींमध्ये)
सदनिका - ६०९
अनिवासी - ५४९
मोकळी जागा - ५४
इतर - ९१

मिळकत कर प्राप्त प्रथम पाच क्षेत्रीय कार्यालय (कोटींमध्ये)
- हडपसर-मुंढवा प्रभाग - २०१.०३
- नगर रस्ता-वडगावशेरी प्रभाग - १८३.९७
- औंध-बाणेर प्रभाग - १५३.६७
- कोथरूड-बावधन प्रभाग - ११३.३२
- धनकवडी-सहकारनगर प्रभाग - ९३.४४

मिळकत कर प्राप्त शेवटची पाच क्षेत्रीय कार्यालय (कोटींमध्ये)
- भवानी पेठ प्रभाग - २९.५७
- कसबा-विश्रामबागवाडा प्रभाग - ४३.८१
- बिबवेवाडी प्रभाग - ४५.७०
- वारजे-कर्वेनगर प्रभाग - ४६.८९
- वानवडी-रामटेकडी प्रभाग - ४८.७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.