‘डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वाढीव जागा द्या’

‘डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वाढीव जागा द्या’

जुनी सांगवी, ता. १८ ः दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण कामासाठी जागा कमी पडत असल्याने महापालिकेने दोन हजार चौरस फूट जागा देण्याबाबत सर्व पक्ष संस्था सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. मंगळवारपासून हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून, जागा मिळेपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या मागणीस जाहीर पाठिंबा देत स्थानिक सर्व पक्ष संघटना लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
सर्व आंबेडकरवादी पक्ष व सर्व संघटनांच्या वतीने दापोडी येथील आंबेडकर पुतळा हा भविष्यात रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे उपलब्ध असणारी जागा अपुरी पडणार असून, पर्यायी जागेची उपलब्धता करण्यात यावी. यासाठी पुतळ्या मागील हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर शाळा आवारातील दोन हजार स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी. अशा मागणीसह दापोडीतील सर्व पक्ष संघटना व सामाजिक संघटनाच्यावतीने धरणे आंदोलनाद्वारे महापालिकेकडे मागणी करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनात चंद्रकांता सोनकांबळे, राजेंद्र गायकवाड, संदीप गायकवाड, नगरसेविका स्वाती काटे, रोहित काटे गोपाळ मोरे, सनी ओव्हाळ, सिकंदर सूर्यवंशी, विनय शिंदे, सतीश मटपरती, रवी कांबळे, प्रीतम कांबळे, भाऊ म्हस्के, संतोष सकपाळ, विद्या गायकवाड आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

‘‘प्रजासत्ताकदिन १४ एप्रिल, ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, इतर शासकीय सण उत्सव याकाळात अभिवादन व इतर कार्यक्रमांसाठी येथे मोठी गर्दी होते. जागा अपुरी पडत असल्याने गेली दोन वर्षांपासून आमची महापालिकेकडे मागणी आहे.’’
- चंद्रकांता सोनकांबळे, सरचिटणीस, रिपाई महिला आघाडी

दापोडी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभीकरण जागेच्या मागणीबाबत धरणे आंदोलन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com