ओमिक्रॉन
ओमिक्रॉन esakal

संसर्ग अधिक, आजार सौम्य; ओमिक्रॉन झाल्यास अशी घ्या काळजी

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील विषाणूचा संसर्ग राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संसर्गाचा दर जरी सर्वाधिक असला, तरी या आजाराचे स्वरूप सौम्य प्रकारचे आहे.
Published on
Summary

कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील विषाणूचा संसर्ग राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संसर्गाचा दर जरी सर्वाधिक असला, तरी या आजाराचे स्वरूप सौम्य प्रकारचे आहे.

पुणे - कोरोनाच्या ओमिक्रॉन (Corona Omicron) प्रकारातील विषाणूचा संसर्ग (Virus Infection) राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संसर्गाचा दर जरी सर्वाधिक असला, तरी या आजाराचे स्वरूप सौम्य प्रकारचे आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ, सहव्याधी किंवा दुर्धर आजार आणि लसीकरण (Vaccination) न झालेल्या नागरिकांनी या काळात विशेष काळजी (Care) घेण्याची गरज आहे. आपल्याला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला तर नक्की काय करायला हवे, याचा घेतलेला आढावा....

जाणून घ्या कोरोनाची लक्षणे

  • खोकला, ताप, श्र्वास घ्यायला त्रास

  • सलग तीन दिवस १०० फॅरनहाइटपेक्षा जास्त ताप

  • शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९३ टक्क्यांपेक्षा कमी

  • छातीत दुखणे, घसा दुखणे थकवा आणि गोंधळल्यासारखे वाटणे

संक्रमणाची शक्यता वाटल्यास उपाययोजना...

  • विलगीकरणात राहा

  • जवळच्या केंद्रात स्वॅब देऊन या

  • सरकारी अथवा फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • सकस आहार, पाणी आणि आराम करा

ओमिक्रॉनचे निदान झाल्यास...

  • गंभीर लक्षणे नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घ्या

  • विलगीकरणासाठी घरातच वेगळी खोली, टॉयलेट, बाथरूम गरजेचे

  • लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीने रुग्णाची देखभाल करावी

  • घरातल्यांनी तीन स्तराचे मास्क घालावे, शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरणाचे पालन करावे

  • शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर ऑक्सिमीटरच्या साह्याने लक्ष ठेवा

  • आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करा

रुग्णाचा आहार

  • सकस, प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा

  • द्रव पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करावे

  • डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, व्यायाम आणि प्राणायाम करावे

ओमिक्रॉन
कागदी पुठ्ठ्यापासून कुणालने बनवल्या तब्बल ५० गाड्या

लसीकरणाचा नक्की फायदा झाला आहे. त्यामुळेच ओमिक्रॉनच्या संसर्गानंतरही सौम्य लक्षणे दिसतात. पुढील काही आठवड्यात बाधितांची संख्या लाखांच्या पटीत होईल. अशा वेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. तातडीने निदान करणे, शक्य असल्यास घरी उपचार करणे गरजेचे आहे.

- डॉ. सुभाष साळुंखे, राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सल्लागार

तातडीने लसीकरण पूर्ण करणे आणि गर्दीत जाणे टाळले तर कोरोनाचा संसर्गाला आळा घालता येईल. साठ वर्षाखालील ज्यांना कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत आणि इतर आजारही नाही, अशांनी घरातच उपचार घेणे शक्य आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी, खोकल्याची नोंद ठेवा.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

साधारणपणे पाच दिवसात ओमिक्रॉन रुग्णाची लक्षणे बरी होत आहे. त्यामुळे मास्क, शारीरिक अंतर आणि हात स्वच्छ धुण्याच्या त्रिसुत्रीबरोबरच निदान झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वपूर्ण आहे. घाबरून न जाता उपचार घ्यायला हवेत.

- डॉ. अरविंद परमार, वैद्यकीय अधिकारी, कमला नेहरू रूग्णालय, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.