रेमडेसिव्हिर
रेमडेसिव्हिरईसकाळ

पुण्यात ‘रेमडेसिव्हिर’चा पुरेसा साठा अन्न व औषध प्रशासनाची माहिती

मागणी वाढली नसल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण
Published on

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली नसल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले.

शहरात जानेवारीपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोना झालेल्यांपैकी सुमारे चार ते साडेचार टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. बहुतांश रुग्ण गृहविलगिकरणात बरे होत आहे. त्यांना मूलभूत औषधे, विश्रांती आणि मीठ-साखर-पाणी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. त्या आधारावर रुग्ण सात दिवसांमध्ये पूर्ण बरा होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

रेमडेसिव्हिर
रोजीरोटीचे भान ठेवा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा राज्यांना सल्ला

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप जोशी म्हणाले, ‘‘शहरात कोरोनाच्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली होती. त्याचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला होता. कोरोनाची सध्या रुग्ण संख्या वाढत असली तरीही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन द्यावे लागत नाही.’’

जिल्ह्यात सध्या सात हजार ६६५ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी सुमारे ९५ टक्के रुग्ण गृहविलगिकरणात आहेत. जिल्ह्यातील ७७० रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आली, असे ‘अन्न व औषध प्रशासना’तर्फे (एफडीए) सांगण्यात आले.

‘एफडीए’चे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा म्हणाले, “पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये चार हजार ७७२ वायल्स असून, सरकारी यंत्रणेमध्ये एक लाख २४ हजार ९५ वायल्सचा साठा आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असली तरीही रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.’’

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णसंख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणावर लहान ‘कोविड सेंटर’ला शहरात व ग्रामीण भागात मान्यता दिली होती. डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी वाढली होती. त्यामुळे गेल्या वर्षी एप्रिलपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या इंजेक्शनचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षामार्फत नियंत्रण ठेवण्यात आले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपलब्ध होणारा साठा आणि
वितरणाची व्यवस्था उभारण्यात आली. या कक्षातर्फे एक लाख ८७ हजार ७२४ रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा पुरसे असल्याचे ‘एफडीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

रेमडेसिव्हिर
चीनच्या नद्यांवरील डेटासाठी भारताने मोजले तब्बल 158 दशलक्ष रुपये

‘टोसिलिझुमॅब’चा साठाही मुबलक
कोरोनाच्या अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना उपचारादरम्यान गरजेनुसार टोसिलिझुमॅब हे इंजेक्शन दिले जाते. गेल्याव र्षी त्याचाही तुटवडा शहरात निर्माण झाला होता. त्यामुळे या इंजेक्शनचे वितरणही नियंत्रण कक्षेमार्फत करण्यात आले. आतापर्यंत ४०० मिलीग्रॅमच्या २०० आणि ८० मिलीग्रॅमच्या इंजेक्शनची मागणीही अत्यल्प असून त्याच्या १९६ वायल्सचा मोठा साठा शिल्लक आहे.

‘रेमडेसिव्हिर’चा साठा (वायल्स)
पुणे विभाग : ३ लाख ४८ हजार ६५६
पुणे जिल्हा : १ लाख २८ हजार ८६७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.