Top in cleanliness Garbage questions were like
Top in cleanliness Garbage questions were likesakal

स्वच्छतेत अव्वल; कचरा प्रश्न जैसे थे!

शहर स्वच्छतेमध्ये देशात पुण्याचा पाचवा क्रमांक लागत असला तरी शहरातील कचऱ्याचा आणि गाड्यांचा प्रश्न काही सुटत नाही
Published on

पुणे : (Pune news) शहर स्वच्छतेमध्ये देशात पुण्याचा पाचवा क्रमांक लागत असला तरी शहरातील कचऱ्याचा आणि गाड्यांचा प्रश्न काही सुटत नसल्याचे पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या खडाजंगीवरून दिसून आले. मोटार वाहन विभागातर्फे विविध कामांसाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्य सभेत आज ठेवण्यात आला. त्यावेळी नगरसेवकांनी कचरा उचलणाऱ्या गाड्यांची पोलखोल केली.

Top in cleanliness Garbage questions were like
महाविद्यालयीन तरुण-तरुणींमुळे भोरच्या नाना-नानी पार्कला कुलूप

शहरात कचरा उचलणाऱ्या गाड्या चार ते पाच महिन्यांपासून बंद आहेत, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मोटार वाहन विभागातर्फे गाड्या भाडे तत्त्वावर घेणे सुटे भाग घेणे, आरटीओचे काम करून घेणे यासाठी पाच कोटी रुपयांचे वर्गीकरण उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेत ठेवण्यात आला होता. त्यावेळी नगरसेवकांनी या गाड्यांची नादुरूस्ती, अपुऱ्या गाड्यांविषयी चर्चा केली. नादुरुस्त गाड्यांचे स्पेअर पार्ट परदेशातून येतात का? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी उपस्थित केला.

Top in cleanliness Garbage questions were like
केतकी माटेगावकरचा संगीत अल्बम लवकरच...

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रिया गदादे-पाटील म्हणाल्या, भाडे तत्त्वावर गाड्या घेतल्या जातात, पण सतत या गाड्या खराब होतात. दिलीप वेडे पाटील म्हणाले, आमच्या भागातील गाडी तीन महिने गॅरेजला आहे. स्पेअर पार्ट परदेशातून आणायचे आहेत का? समाविष्ट गावांमुळे प्रभाग मोठा झाला त्यामुळे तेथे कचरा संकलनासाठी गाडी आवश्यक आहे. यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी ३०० गाड्या कमी आहेत, गाड्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असा खुलासा केला.

प्रवीण चोरबेले यांनी मोटार वाहन विभागालाच धारेवर धरले, ते म्हणाले, ‘‘मोटार वाहन विभागाचा डेपो माझ्या प्रभागात आहे. येथे भेट दिल्यानंतर तेथील भीषण परिस्थिती डोळ्यासमोर येईल. नवीन गाड्या खराब झाल्या आहेत, त्या दुरुस्त करणारे मेकॅनिक मिळत नाही म्हणून अनेक महिन्यांपासून गाड्या बंद पडलेल्या आहेत. मोटार वाहन विभागाला कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांबद्दल काही देणे घेणे नाही.’’

Top in cleanliness Garbage questions were like
कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा ; श्रीनिवास पाटील

राडारोडा उचलणाऱ्या गाड्या अतिशय भंगार अवस्थेतील आहेत. फोन केले तरी गाड्या उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते. जेटींग मशिनला मागणी आहे. त्यामुळे डिझेल जास्त लागत असल्याचे योगेश ससाणे यांनी सांगितले. तर महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील ग्रामपंचायतीच्या खराब झालेल्याकचऱ्याच्या गाड्या पालिका दुरूस्त तर करत नाही. त्यात नव्या गाड्या देण्याचे लांबच आहे. मोटार विभागही व्यवस्थित काम करत नसल्याची टीका गणेश ढोरे यांनी केली.


महापालिकेकडे कचऱ्यासाठी ६८३ गाड्या आहेत, यातील १६० गाड्या १५ वर्ष जुन्या आणि ९० गाड्या या १० ते १५ वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे मेन्टेनन्स जास्त आहे. २३ गावांच्या समावेशानंतर २७० गाड्यांची कमतरता असून १५ व्या वित्त आयोगातून ५६ गाड्या घेत आहोत. उर्वरित गाड्या ठेकेदाराकडून घेतल्या जातील.
- महेश डोईफोडे, उपयुक्त, महानगरपालिका

तीनशे गाड्यांची गरज आहे, याची निविदा ७ वर्षासाठी काढली जाणार आहे. अतिरिक्त गाड्या सध्याच्या ठेकेदाराकडून मागवून घेऊ. नवीन गावात देखील गाड्या पुरविल्या जातील.
- विक्रम कुमार, आयुक्त महापालिका

रोज निर्माण होणारा कचरा - २१०० ते २२०० टन
ओला कचरा - ७०० ते ८०० टन
सुका कचरा - १३०० ते १४०० टन
कचरा वाहतूक करणारी वाहने - ६८३
कमी पडणारे वाहने - ३००
सफाई कर्मचारी - सुमारे १० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()