Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येपेक्षा मतदार संख्याच जास्त

पुणे महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना निश्‍चित करण्यात येणार असली, तर मतदार संख्या ही २०२१ ची ग्राह्य धरण्यात येणार आहे.
Published on
Summary

पुणे महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना निश्‍चित करण्यात येणार असली, तर मतदार संख्या ही २०२१ ची ग्राह्य धरण्यात येणार आहे.

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) २०११ ची जनगणना (Census) ग्राह्य धरून वॉर्ड रचना (Ward Structure) निश्‍चित करण्यात येणार असली, तर मतदार संख्या (Voter Number) ही २०२१ ची ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील प्रभाग रचना आणि आगामी निवडणूकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप रचनेत शंभर टक्के बदल झाला आहे.

पुण्यासह राज्यातील महापालिका आणि नगरपालिका यांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नजीकची जनगणना ग्राह्य धरण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या एक सदस्यीय पद्धतीने २००७ मध्ये निवडणुका झाल्या होत्या.

Pune Municipal Corporation
Budget 2022 : परवडणाऱ्या घरांसाठीची तरतूद बांधकाम क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाची

त्यासाठी २००१ ची जनगणना ग्राह्य धरून वॉर्ड रचना करण्यात आली. त्यानंतर २०११ मध्ये केंद्र सरकारकडून नव्याने जनगणना करण्यात आली. २००१ आणि २०११ च्या जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास सकाळने केल्यानंतर जुन्या पुण्यात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकसंख्या कमी आणि मतदार संख्या जास्त होणार असल्याचे समोर आले. २०२२ रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघातील मतदार संख्या तसेच राज्य निवडणूक आयोग जी तारीख निश्‍चित करून देईल, त्या कट ऑफ डेटची मतदार संख्या विचारात घेता याद्या फोडून त्यानंतर वॉर्ड रचना तयार करण्यात आली. त्यामुळे लोकसंख्येपेक्षा मतदार संख्या जास्त झाल्याचे हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

जनगणना न झाल्यामुळे मध्यंतरी राज्य सरकारने कायद्यात बदल करीत सदस्य संख्येत वाढ केली. मात्र २०११ ची जनगणना ग्राह्य धरून महापालिकेने आज प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार कमीत कमी ५५ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग असणार आहे. तर ७० हजार लोकसंख्येचा सर्वात मोठा प्रभाग झाला आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या जरी कमी दिसत असली, तरी अनेक प्रभागात मतदार संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे विजयासाठी मतांची बांधणी करताना उमेदवारांना दमछाक करावी लागणार आहे. जनगणनेतील त्रुटीचा फटका जसा महापालिका आणि शासकीय योजनांना बसतो. तसाच तो महापालिका निवडणुकांना देखील बसतो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()