Pune Municipal
Pune MunicipalSakal

पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरून शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Published on
Summary

पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरून शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे - महापालिका निवडणुकांसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभाग रचनेवरून (Ward Structure) शहरातील राजकीय समीकरणे (Political Equations) बदलण्याची (Changes) शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेतील अनेक आजी-माजी पदाधिकारी अडचणीत आल्याने त्यांची झोप उडाली आहे. प्रभागाचे तुकडे झाल्याने अनेकांना नवीन प्रभाग (New Ward) शोधण्याची वेळ आली. तर काही प्रभागात विद्यमांची भाऊगर्दी झाल्याने अनेकांना घरी बसवे लागण्याची अथवा दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

महापालिकेच्या राजकारणात गेली अनेक सक्रिय असलेल्या काहीजणांना मात्र या रचनेत सुध्दा दिलासा मिळाला. एकूणच या रचनेवरून सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांमध्ये ‘थोडी खुशी-थोडा गम’ असे वातावरण आहे. राजकीय वादामुळे उत्सुकता ताणली गेलेली महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी अखेर प्रसिद्ध झाली. तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने ही रचना करण्यात आली असल्यामुळे २०१७ च्या निवडणुकीतील प्रभागात रचनेत जवळपास शंभर टक्के बदल झाला आहे. या बदलाने अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर नव्याने काही जणांना आपले राजकीय करिअरला सुरवात होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

प्रभाग रचनेत प्रस्थापित नेत्यांनी आपले प्रभाग हवे तसे करून घेतले असल्याची एक चर्चा होती. मात्र ते मोजक्याच नेत्यांना त्यामध्ये यश असल्याचे या रचेनेवरून समोर आले आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या निमित्ताने काही नेत्यांनी आपले राजकीय हिशोब देखील चुकते केले असल्याचे दिसून आले. या रचनेवरून सर्वच राजकीय पक्षांनी आपल्यासाठी ती अनुकूल असल्याचा दावा केला असला, तरी उमेदवार देताना पक्षाच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Pune Municipal
पुणे : महाविद्यालयीन युवकाच्या ब्लेडने भुवया कापल्या

शहराच्या मध्यवस्तीतील अनेक विद्यमान नगरसेवकांना या रचनेचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभाग विचित्र पद्धतीने फोडण्यात आल्यामुळे आणि पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे अनेकांना महापालिकेच्या सभागृहात परत जाणे अवघड होणार आहे. विशेषत: भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकाच प्रभागात विद्यामान आणि इच्छुकांची संख्या जास्त झाल्याने कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामध्ये सध्या महापालिकेत पदाधिकारी असलेल्यांना देखील तिकिटासाठी संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांची देखील ही परिस्थिती आहे. उमेदवारी मिळाली, तरी प्रभाग रचनेत झालेल्या बदलामुळे विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे. तर काही जणांना स्वत:च्या इच्छेवर पाणी सोडून पत्नीला पुढे करण्याची वेळ येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातून पक्षांत्तर वाढण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर

सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना नाराजांची मनधरणी करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. मात्र महापालिकेतील काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना त्यांना हवा तसा प्रभाग करून घेण्यात यश आल्याने त्यांच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

महापौरांसमोर आव्हान...

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाग फुटल्याने ते कुठून रिंगणात उतारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कोथरूड गावठाण आणि शिवतीर्थ नगर प्रभागातून ते उतरले, तर तेथे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आणि माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचा सामना करावा लागणार आहे. जयभवानी नगर-केळेवाडी परिसरात माजी उपमहापौर दीपक मानकरांचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यामुळे बावधन खुर्द-महात्मा सोसायटी हा प्रभाग अथवा पत्नीला रिंगणात उतरवून पुन्हा पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी झटणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवार मिळविण्याची लाढाई

शनिवारपेठ-राजेंद्र नगर या प्रभागात स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आमदार मुक्ता टिळक, माजी सभागृह नेता धीरज घाटे, राजेश येनपुरे, युवकचे अध्यक्ष बापू मानकर, गायत्री खहके, खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांच्यासह इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या प्रभागात निवडणुकीतील विजयाआधी उमेदवार मिळविण्यासाठीची लाढाई जिंकावी लागणार आहे.

Pune Municipal
पुणे महापालिका निवडणुकीसाठी लोकसंख्येपेक्षा मतदार संख्याच जास्त

आजी-माजी नेत्यांची चुरस

सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, विद्यमान नगरसेविका सुजाता शेट्टी, काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर, योगेश समेळ, पल्लवी जावळे असे आजी-माजी नेते मंडळी शनिवार वाडा-कसबा पेठ की रस्तापेठ-केईएम हॉस्पीटल मधून रिंगणात उतरणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातूनही हे एकमेकांच्या समोर आले, तर तेथील निवडणुकीत रंगत भरणार आहे.

इच्छुकांची संख्या मोठी

पुणे स्टेशन-ताडीवाला रोड प्रभागात काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, लता राजगुरू, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांच्यासह अनेक नेते मंडळी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर कासेवाडी-हरकानगर प्रभागात अविनाश बागवे, मनीषा लडकत, संदीप लडकत, तुषार पाटील, अर्चना पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांचे चिरंजीव, त्यांचे रफिक एकमेकांच्या समोर येणार का, हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. महात्मा फुले स्मारक-टिंबर मार्केट प्रभागातून वनराज आंदेकर, विशाल धनवडे, वीरेंद्र किराड, मनीष साळुंके, मिलिंद काची यांच्यासह इच्छुकांची संख्या मोठी आहे. खडकमाळ आळी-महात्मा फुले मंडई या प्रभागात अजित दरेकर, अजय खेडेकर, संग्राम थोरात, आरती कोंढरे, रूपाली पाटील, नारायण चव्हाण, विजय ढेरे, सौरभ अमराळे, अजय दराडे, दत्ता खेडेकर अनेकजण रिंगणात येण्याची शक्यता आहे. शिवदर्शन पद्मावती प्रभागातून काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणावळ, महेश वाबळे, अश्विनी कदम, रघुनाथ गौड, गणेश घोष, हरीश परदेशी अशी इच्छुांकंची संख्या आहे. माजी समाभगृह नेते धीरज घाटे देखील कदाचित या मतदार संघातून रिंगणात उतरण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

माजी दिग्गजांची मांदियाळी

सहकारनगर-तळजाई प्रभागातून माजी सभागृह नेते सुभाष जगताप, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, विनोद वस्ते, अनिल जाधव अशी दिग्गज मंडळी रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

दृष्टीक्षेप

  • आजी-माजी पदाधिकारी अडचणीत

  • दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ

  • अनेकांचे राजकीय भवितव्य पणाला

  • नव्यांना संधी

  • विद्यमान नगरसेवकांना फटका

  • बदलामुळे विजयासाठी कडवा संघर्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()