‘अंतराळ सुरक्षा’ परिसंवादात देशातील ४०० जणांचा सहभाग
पुणे, ता. २० : लष्कराच्या तिन्ही दलातील अधिकाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (मिलिट) संस्थेचा १० वा स्थापना दीन बुधवारी झाला. या निमित्त मिलिटतर्फे ‘अंतराळ सुरक्षा-राष्ट्रीय सुरक्षा आव्हाने आणि धोरणात्मक परिणाम’ या विषयावर ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात देशातील विविध संरक्षण आस्थापनेतील सुमारे ४०० जणांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी एअर व्हाइस मार्शल व्ही. राजशेखर, आयडीएस मुख्यालयाचे एअर मार्शल बी. आर. कृष्णा, इस्रोच्या मानवी अंतराळ कार्यक्रम संचालनालयाचे संचालक डॉ. व्ही. आर. ललिथांबिका, लेफ्टनंट जनरल अनिल के. भट्ट (निवृत्त), डिफेन्स स्पेस एजन्सीचे महासंचालक एअर व्हाइस मार्शल डी. व्ही. खोत, मेजर जनरल ध्रुव कटोच (निवृत्त) आणि मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसचे ग्रुप कॅप्टन अजय लेले (निवृत्त) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वक्त्यांनी भारतीय दृष्टिकोनातून अंतराळ सुरक्षेची गरज आणि पर्याय यावर भर दिला.
यावेळी अंतराळ सुरक्षेच्या दृष्टीने अद्ययावत तंत्रज्ञान उपकरणांची निर्मिती, तसेच यासाठी आत्मनिर्भर भारत संकल्पंतर्गत खासगी उद्योगांचा समावेश आदींवर चर्चा झाली. बदलत्या युद्धनीतीनुसार अंतराळ सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. याकरिता संरक्षण क्षेत्रासाठी धोरणांची आखणी व तंत्रज्ञान निर्मिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.