Pune-District-Court
Pune-District-CourtSakal

पुणे जिल्हा न्यायालय पूर्ण क्षमतेने सुरू

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू केले आहे.
Published on
Summary

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले न्यायालयीन कामकाज पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू केले आहे.

पुणे - शहरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव ओसरत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दोन शिफ्टमध्ये सुरू असलेले न्यायालयीन कामकाज (Court Work) पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू केले आहे. याबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे (High COurt) रजिस्ट्रार जनरल एम. डब्ल्यू चंदवाणी यांनी राज्यातील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांना दिले आहेत.

त्यानुसार सोमवारपासून (ता. १५) न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे आता न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के उपस्थितीसह कामकाज होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांत वेळोवेळी न्यायालयीन कामकाज प्रभावित झाले होते. कर्मचाऱ्यांची संख्या, वेळेचे बंधन आणि केवळ महत्त्वाच्या खटल्यांवरच सुनावणी होत होती. त्यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या वाढली होती. दरम्यान, न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू झाल्यामुळे मागील दोन वर्षात रेंगाळलेल्या खटल्यांच्या सुनावणीला गती मिळणार आहे.

Pune-District-Court
आंबेगावची होतेय बुधवार पेठ; पोलिसांना हप्ते देऊन देहविक्री?

पुणे जिल्हा न्यायालयातील कामकाज पूर्ववत करण्यासोबतच कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी न्यायालय परिसरात येणाऱ्या नागरिकांनी मास्क परिधान करणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग आदी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे पुणे जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()