पुणे : खरेदीच्या आमिषाने डॉक्टरला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा
पुणे: ओएलएक्स वरून एसी आणि बेड खरेदीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका डॉक्टर तरुणाला पावणेतीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत डॉ. वासव राठोड (वय २४, रा. नॅन्सी लेक होम, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. राठोड यांनी घरातील जुना एसी आणि बेड विक्रीची जाहिरात ओएलएक्सवर अपलोड केली होती. जाहिरातीत डॉ. राठोड यांनी मोबाईल क्रमांक दिला होता. चोरट्यांनी डॉ. राठोड यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
एसी तसेच बेड खरेदीची बतावणी करून चोरट्यांनी त्यांना क्यूआर कोड पाठविला व तो कोड स्कॅन करण्यास डॉ. राठोड यांना सांगितले. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने पैसे खात्यात जमा करतो, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. क्यूआर कोडच्या आधारे चोरट्यांनी डॉ. राठोड यांच्या बँक खात्याची माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने डॉ. राठोड यांच्या खात्यातून दोन लाख ७६ हजार रुपये लांबविले. बँक खात्यातून पैसे लांबविण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर डॉ. राठोड यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.