TET exam
TET examTET exam

TET Exam : पैसे देणाऱ्यांची नोकरी धोक्यात; ८००० उमेदवार सायबर पोलिसांच्या रडारवर

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) दलालांमार्फत अधिकाऱ्यांना पैसे पोचवून पात्र झालेले सुमारे आठ हजार उमेदवार आता सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
Published on
Summary

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) दलालांमार्फत अधिकाऱ्यांना पैसे पोचवून पात्र झालेले सुमारे आठ हजार उमेदवार आता सायबर पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) (TET Exam) दलालांमार्फत (Agent) अधिकाऱ्यांना पैसे (Money) पोचवून पात्र झालेले सुमारे आठ हजार उमेदवार (Candidate) आता सायबर पोलिसांच्या (Cyber Police) रडारवर (Radar) आले आहेत. गैरप्रकार करून टीईटी उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ गुरुजींची पुणे सायबर पोलिस व शिक्षण विभागाने माहिती जमा केली आहे. त्यापैकी अनेकजण सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या नोकरीवरच कडक कारवाईची (Crime) टांगती तलवार येण्याची शक्‍यता आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांच्या सायबर सेलला ‘टीईटी’मध्येही गैरप्रकार झाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी प्रारंभी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा सल्लागार अभिषेक सावरीकर, परिषदेचा माजी अध्यक्ष सुखदेव ढेरे, जी.ए.चा माजी संचालक आश्विनकुमार आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह अनेक दलालांना बेड्या ठोकल्या.

या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच २०१९-२० च्या टीईटी परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या सुमारे आठ हजार उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, अपात्रचे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला पाठविली. संबंधित नावांची पडताळणी करून त्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून सायबर पोलिसांना देण्यात आली.

TET exam
पर्यटनादरम्यान निष्काळजीपणामुळे पर्यटकांसोबत अपघात होण्याच्या घटना घडतात

हरकळ बंधूंकडे नावांची यादी

पोलिसांनी डॉ. प्रीतिश देशमुखसमवेत अटक केलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ या दोघांकडे दीड हजार जणांच्या नावांची यादी होती. त्यामुळे या दीड हजार जणांव्यतिरिक्त उर्वरित सहा हजार ५०० जणांपर्यंत सायबर पोलिसांना पोचायचे आहे. त्यादृष्टीने जिल्हानिहाय उमेदवारांचा जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

जिल्हानिहाय घेणार जबाब

अपात्रचे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावांच्या यादीची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. त्यानुसार, नमुना पद्धतीने आता जिल्हानिहाय ५ ते १० जणांना सायबर पोलिस नोटीस बजावणार आहे. त्यानंतर त्यांना सायबर पोलिस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यांच्या जबाबातून आणखी काही जणांची माहिती मिळण्याची शक्‍यता असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पात्र असूनही त्यांनी दिले पैसे

आरोपींनी पात्र करण्यासाठी पाठविलेली उमेदवारांच्या नावांची यादी व प्रत्यक्षात उत्तीर्ण झालेल्यांची यादी शिक्षण विभागाने पडताळणी केली. त्यामध्ये २१ उमेदवार हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. परंतु, त्यांनीही अपात्र होण्याच्या भीतीपोटी गुण वाढविण्यासाठी दलालांमार्फत पैसे दिल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित २१ उमेदवारांची नावे अपात्रच्या यादीतून वगळली आहेत.

TET exam
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यात ६४,२४३ ने झाली कमी

टीईटीसाठी आम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करूनही पात्र ठरू शकलो नाही, तर काहीजण पैसे भरून पात्र ठरले, नोकरीलाही लागले. त्यांनी सरकारची व आमचीही फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिस व शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी.

- कैलास सातपुते, उमेदवार

अपात्रचे पात्र झालेल्यांचे जबाब घेतले जाणार आहेत, त्यातून आणखी काही लोकांपर्यंत पोचता येईल. पैसे भरून अपात्र असूनही गुणवाढ करून पात्र ठरलेल्यांवर त्यांच्या विभागाकडून कडक कारवाई होऊ शकते.

- पोलिस अधिकारी

  • ०२ - टीईटी प्रकरणात दाखल गुन्हे

  • ७ हजार ८८० - अपात्रचे पात्र झालेले उमेदवार

  • २१ - पात्र असूनही पैसे देणारे उमेदवार

  • २३ - अटक केलेल्यांची संख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.