pune city
pune citysakal

श्रीमंतीमध्ये पुणेकर देशात तिसऱ्या स्थानावर

‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण सर्वांना परिचित असून त्याची प्रचिती पुन्हा एकदा देशातील श्रीमंत व्यक्तींच्या संदर्भात आली आहे.
Published on
Summary

‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण सर्वांना परिचित असून त्याची प्रचिती पुन्हा एकदा देशातील श्रीमंत व्यक्तींच्या संदर्भात आली आहे.

पुणे - ‘पुणे तेथे काय उणे’ ही म्हण सर्वांना परिचित असून त्याची प्रचिती पुन्हा एकदा देशातील श्रीमंत व्यक्तींच्या (Rich Person) संदर्भात आली आहे. अत्‍यंत श्रीमंत व्‍यक्‍ती असलेल्‍या शहरांमध्‍ये पुणे (Pune City) देशात तिसऱ्या क्रमांकावर (Third Rank) आहे. ‘नाइट फ्रँक’च्‍या ‘दि वेल्‍थ रिपोर्ट’च्‍या मते २०२१ मध्ये पुण्‍यात अल्‍ट्रा-हाय नेट वर्थ (यूएचएनडब्‍ल्‍यूआय म्हणजेच ३३० दशलक्ष यूएस डॉलर्स व त्‍यापेक्षा अधिक निव्‍वळ संपत्ती) असलेल्या ३६० व्‍यक्‍ती होत्या.

देशातील अत्‍यंत श्रीमंत व्‍यक्‍तींची संख्या असलेला नाइट फ्रँकचा दि वेल्‍थ रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यात पुण्यासह देशातील अत्‍यंत श्रीमंत व्‍यक्‍तींची आकडेवारी दिली आहे. या व्‍यक्तींच्या बाबतीत मुंबई व हैदराबाद अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरातील यूएचएनडब्‍ल्‍यूआय व्‍यक्‍तींची संख्‍या २०२६ पर्यंत २७.४ टक्‍क्‍यांनी वाढून ४५८ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांमध्‍ये यूएचएनडब्‍ल्‍यूआयची संख्‍या २०१६ मधील २५३ च्‍या तुलनेत ४२.५ टक्‍क्‍यांनी वाढून २०२१ मध्‍ये ३६० पर्यंत पोचली आहे.

गेल्या वर्षी देशातील यूएचएनडब्‍ल्‍यूआयच्‍या संख्‍येमध्‍ये वार्षिक ११ टक्‍क्‍यांची वाढ झाली. देशात स्‍वयंनिर्मीत आणि ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्‍या यूएचएनडब्‍ल्‍यूआयच्‍या टक्‍केवारी वाढीमध्‍ये सहावा क्रमांक होता. जागतिक स्‍तरावर २०२१ मध्‍ये अत्‍यंत श्रीमंत व्‍यक्‍तींची संख्‍या ९.३ टक्‍क्‍यांच्‍या वार्षिक वाढीसह सहा लाख १० हजार ५६९ पर्यंत पोचली आहे.

pune city
पुणे : तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक शाळा ‘अनलॉक’

बांधकाम क्षेत्रात गुंतवणुकीला पसंती

भारतीय यूएचएनडब्‍ल्‍यूआयची २९ टक्‍के संपत्ती प्राथमिक गरजा व दुसरे घर खरेदी करण्‍यासाठी खर्च करण्‍यात आली आहे. यूएचएनडब्‍ल्‍यूआयची २० टक्‍के गुंतवणूकीय संपत्ती व्‍यावसायिक प्रॉपर्टीच्‍या (भाडेतत्त्वावरील प्रॉपर्टी, कार्यालये इत्‍यादींसह) प्रत्‍यक्ष खरेदीसाठी वितरित केली तर आठ टक्‍के गुंतवणूकीय संपत्ती व्‍यावसायिक प्रॉपर्टीच्‍या (आरईआयटी, फंड्स) अप्रत्‍यक्ष खरेदीप्रती वितरित करण्‍यात आली.

भारतीय यूएचएनडब्‍ल्‍यूआयनी दिलेले प्राधान्‍य

क्रमांक - भारत - जग

१ - कला - कला

२ - दागिणे - महागड्या व जुन्या कार

३ - महागड्या व जुन्या कार - ज्‍वेलरी

४ - घड्याळे - वाइन

५ - लक्‍झरी हँडबॅग्‍स - घड्याळे

(स्रोत : दि वेल्‍थ रिपोर्ट अॅटिट्यूड्स सर्व्‍हे)

यूएचएनडब्‍ल्‍यूआय व्‍यक्‍तींच्‍या संपत्तीमध्‍ये वाढ

यूएचएनडब्‍ल्‍यूआयची संख्‍या : वाढ टक्‍केवारीमध्‍ये

प्रदेश - २०१६- २०२०- २०२१ - २०२६ : २०२०-२१ - २०१६-२१ - २०२१-२६

मुंबई - १,११९ - १,४६५ - १,५९६ - २,०६९ : ९.० टक्के - ४२.६ टक्के - २९.६ टक्‍के

भारत - ७,४०१ - १२,२८७ - १३,६३७ - १९,००६ : ११ टक्के - ८४ टक्के - ३९ टक्‍के

संपूर्ण जग - ३,४८,३५५ - ५,५८,८२८ - ६,१०,५६९ - ७,८३,६७१ : ९.३ टक्‍के - ७५.३ टक्‍के - २८.४ टक्‍के

(स्रोत : नाइट फ्रँक वेल्‍थ साइजिंग मॉडेल)

इक्विटी बाजारपेठा आणि डिजिटल अवलंब हे देशातील यूएचएनडब्‍ल्‍यूआयच्‍या वाढीला चालना देणारे प्रमुख घटक आहेत. भारतातील तरुण, स्‍व-निर्मित यूएचएनडब्‍ल्‍यूआयमधील वाढ अविश्‍वसनीय राहिली आहे. यूएचएनडब्‍ल्‍यूआय आणि अब्‍जाधीश व्‍यक्‍तींमधील उत्तम वाढीसह भारत जगभरातील त्‍यांच्‍या सहकारी देशांमध्‍ये झपाट्याने विकसित होणारा देश बनण्‍याची तसेच स्‍वत:हून आर्थिकदृष्‍ट्या प्रबळ होत विभिन्‍न विभागांमध्‍ये सुपरपॉवर म्‍हणून उदयास येण्‍याची अपेक्षा आहे.

- शिशिर बैजाल, अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.