Nitin Raut
Nitin Rautsakal

पुणे : महावितरण उभारणार जैवविविधता पार्क

राज्यातील औष्णिक, जल, वायू आणि सौर ऊर्जा प्रकल्पात भविष्यात जैवविविधता उद्यान निर्माण होण्यात मदत होणार
Published on

पुणे: प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या परिसरात जैवविविधता उद्याने निर्माण करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून प्रस्ताव पाठवावा, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Nitin Raut
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या बैठकीला महावितरण आणि महापारेषणचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत निर्मिती, पारेषण, वितरण आणि महाऊर्जा या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. वीज निर्मिती प्रकल्पांच्या परिसरात प्रदूषण व अन्य पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना म्हणून जैवविविधता उद्यानांची निर्मिती करावी. त्यासाठी पर्यावरणशास्त्र तज्ज्ञांकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्यावा.

Nitin Raut
Pune City Corona: रुग्णांची संख्या पहिल्यांदा पन्नाशीच्या आत

वीज निर्मिती दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या रासायनिक घटकांचे स्वरूप व प्रमाण लक्षात घेऊन त्यास अनुकूल अशा वनस्पतींची लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवड तसेच सौर ऊर्जेचा वापर याबाबींचा समावेश त्यात करून जैवविविधता उद्यान व सौर ऊर्जा प्रकल्प एकत्र उभारता येईल का, याची चाचपणी करावी. सविस्तर प्रकल्प अहवालासह प्रस्ताव पाठवावा,’’अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे राज्यातील औष्णिक, जल, वायू आणि सौर ऊर्जा प्रकल्पात भविष्यात जैवविविधता उद्यान निर्माण होण्यात मदत होणार आहे. त्याचप्रमाणे कर्मचारी वसाहतींच्या परिसरात कर्मचाऱ्यांची मुले-मुली यांच्यासाठी अद्ययावत ग्रंथालय उभारावे. त्यात विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.