Students Eating Food
Students Eating FoodSakal

परीक्षेला जातायं... असा घ्या आहार!

परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांची अभ्यासाची लगबग सुरू होते. परीक्षेची जोमात तयारी करताना विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात.
Published on
Summary

परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांची अभ्यासाची लगबग सुरू होते. परीक्षेची जोमात तयारी करताना विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात.

पुणे - परीक्षा (Exam) म्हटलं की विद्यार्थ्यांची (Students) अभ्यासाची (Study) लगबग सुरू होते. परीक्षेची जोमात तयारी करताना विद्यार्थी आपल्या आहाराकडे (Food) दुर्लक्ष करतात. परिणामी एकीकडे परीक्षेचा ताण (Stress) आणि आहाराकडे दुर्लक्ष (Ignore) यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती (Health) बिघडण्याची शक्यता असते. नेमकं हेच टाळण्यासाठी परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा आहार सकस असला पाहिजे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल, तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होत आहे. राज्यातील जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी सध्या या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. खरंतर कोणतीही परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यांच्या संतुलित आहाराकडे पालकांनी प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे आहारतज्ज्ञ सांगत आहेत.

Students Eating Food
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

परीक्षा काळात विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा, याबाबत काही टिप्स पुढीलप्रमाणे :

हे करावे

१. प्रथिनयुक्त आहार गरजेचा

- परीक्षार्थींचा आहार प्रथिनयुक्त असणे गरजेचे आहे. आहारामध्ये मुगाची डाळ, दूध, दही, मोड आलेली कडधान्ये याचा समावेश असावा. प्रथिनयुक्त पदार्थ नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण यात असायला हवीत.

२. दररोज नाश्ता हवा

- सकाळचा नाश्ता कधीही वगळू नये. सकाळी पौष्टिक नाश्ता केल्यास दिवसभर विद्यार्थी ताजेतवाने वाटले त्यामुळे अभ्यासही चांगला होईल. आहार शक्यतो सात्त्विक असायला हवा.

३. भरपूर पाणी पिणे

अनेक विद्यार्थी हे पाणी खूप कमी पितात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाणी पिणे होत नसल्यास आवर्जून पाणी पिण्यासाठी गजर लावावा आणि पाणी प्यावे.

४. अंतर ठेवून जेवण करावे

- दर काही तासांनी आरोग्यदायी गोष्टी खात रहा. एकाचवेळी भरपूर किंवा अनेक पदार्थ खाण्यापेक्षा थोड्या-थोड्यावेळाने खात जा. त्यामुळे अभ्यास करताना झोप येणार नाही आणि नेहमी उत्साही वाटले.

हे करू नका

१. तेलकट, तिखट पदार्थांचे सेवन

- परीक्षेच्या काळात संतुलित, सकस आहार असायला हवा. आहारात प्रथिनयुक्त पदार्थ असायला हवेत. जास्त तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोटदुखी, खोकला याला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे असे पदार्थ टाळावेत.

२. अतिगार पदार्थ

- उन्हाचा कडाका जाणवत असला तरी शीतपेय (कोल्ड्रिंक्स) पिणे टाळावे. शक्यतो बाहेर सरबत, शीतपेये घेऊ नयेत. घरातील नारळ पाणी, ताक यांसह लिंबू सरबत चालू शकतील. परंतु बाहेरील शीतपेये कटाक्षाने टाळावीत.

३. बाहेरील, पॅक बंद पदार्थ, जंक फूड

- परीक्षेच्या काळात बाहेरील अन्न टाळावे. बाहेरील पदार्थ, किंवा पॅकबंद पदार्थ, जंक फूड खाल्ल्यास त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. खूप खारट पदार्थ खाणे टाळावे.

४. अतिरिक्त गोड पदार्थ

- अतिरिक्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यास मेंदू शिथिल होतो. परिणामी स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे चिडचिड वाढू शकते. केलेला अभ्यास पुन्हा-पुन्हा आठवण्याची क्षमता कमी होऊ शकते. अभ्यास झालाय, परंतु अचानक ‘ब्लॅक’ झाल्यासारखे होईल.

Students Eating Food
पुणे : उघड्यावर पडलेल्या विजवाहिनीचा संपर्क झाल्याने ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

आहारात हव्या या गोष्टी

- दिवसातून किमान दोनदा तरी फळे खावीत

- दुपार आणि रात्रीच्या जेवणात पालेभाज्या, फळभाज्या असाव्यात

- मुगाच्या डाळीची खिचडी जेवणात असल्यास चांगले

- शरिरात पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लिंबू सरबत, नारळ पाणी प्यावे

- बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे खावेत

- आरोग्यदायी फॅट्स, फायबर असणारे पदार्थ खाते

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना सकस, संतुलित आणि प्रथिनयुक्त आहार देणे गरजेचे आहे. घरातील अन्न पदार्थ खायला प्राधान्य द्यावे. शरीरात पाण्याची कमतरता पडून नये, म्हणून भरपूर पाणी प्यावे. परीक्षेला जाताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. आहारात पालेभाज्या, फळभाज्या आणि ऋतुमानानुसार मिळणारी फळे असावीत.

- डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ज्ञ

परीक्षेच्या काळात मुलांचा मेंदू अधिक कार्यक्षम असायला हवा, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची धान्ये (उदा. हात सडीचा तांदूळ, ज्वारी, नाचणी आदी) आहारात असावीत. त्याशिवाय आरोग्यदायी फॅट्स मिळायला हवेत त्यासाठी तीळ, जवस, शेंगदाणे, अक्रोड, बदाम खायला हवेत. पोट भरणे गरजेचे आहे, तरच मेंदू अधिक कार्यक्षम होईल. त्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खायला हवेत.

- डॉ. विभूषा जांभेकर, आहारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()