Pune Metro
Pune Metro

पुणेकरांनो असा करा मेट्रोचा प्रवास; सुविधा, नियमांबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रो आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुली झाली. गरवारे ते वनाज स्थानका दरम्यानचा टप्प्यावर मेट्रोचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजेपासूनच स्थानक परिसरात नागरिकांचे आगमन झाले होते. स्वयंचलित जिने, माहितीदर्शक फलक नागरिक कुतूहलाने पाहत होते. गरवारे स्थानक ते वनाज स्थानकादरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्याच फेरीत सुमारे एक हजार नागरिकांनी प्रवास केला.

असा करा मेट्रोने प्रवास

- रस्त्याच्या बाजूला मेट्रो स्टेशनवर जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था
- प्रवेशद्वाराने वर गेल्यावर लगेचच तिकीट घर
- महामेट्रोचे Pune Metro या ॲपद्वारेही ऑनलाइन तिकीट बुक करता येते
- तिकीट मिळाल्यानंतर स्टेशनच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटफॉर्मवर जायचे आहे
- यासाठी तिकिटावरील क्युआरकोड स्कॅन करत बॅरीकेट्स खुले होतात
- प्रत्येक स्टेशनवर दोन प्लॅटफॉर्म असून आपली गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. हे पाहूनच जिना चढा
- प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या रेषेच्या मागे थांबा
- मेट्रो आल्यावर दरवाजे खुले होतात. आतील प्रवासी बाहेर आल्यावर मेट्रोत चढा

प्रवाशांसाठी स्टेशनवर कोणत्या सुविधा?
- पार्किंग, चार्जिंग स्टेशन, ई-बाईकची सुविधा
- सरकते जिने आणि उदवाहकाची व्यवस्था
- फलकांसह घोषणा प्रणाली
- सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि बेबी केअर रूम
- दिव्यांगांसाठी आवश्यक ती व्यवस्था उपलब्ध
- सुरक्षेसाठी धातुशोधक प्रणाली आणि सामानासाठी एक्स-रे प्रणाली

Pune Metro
PM Modi In Pune: कसा होता PM मोदींचा पुणे दौरा; वाचा सगळे अपडेट्स

मेट्रोमध्ये असणाऱ्या सुविधा
- दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सहज वापरा येते
- स्टेशनची माहिती देणारे डिजिटल फलक व उद्घोषणा
- आणीबाणीच्या स्थितीत संवादासाठी प्रत्येक डब्यात चार युनिट
- डब्याच्या दोन्ही बाजूला मोबाईल चार्जिंगची व्यवस्था
- रुंद प्रवेशद्वार

मेट्रोतून प्रवास करताना अशी घ्या काळजी

- मास्क घालून, तिकीटासह प्रवास करा
- उद्घोषणा काळजी पुर्वक ऐका
- सरकते जिने आणि मेट्रोत चढता-उतरताना काळजी घ्या
- लहान मुलांची काळजी घ्या
- मेट्रोत उभे राहताना हॅंडल घट्ट पकडा
- प्रवाशांना आधी मेट्रोमधून बाहेर पडू द्या, मग चढा
- प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे उभे रहा

मेट्रोत या गोष्टी टाळा

- पाळीव प्राण्यांना सोबत घेऊ नका
- मेट्रोमध्ये किंवा लिफ्टमध्ये चढताना घाई करू नका
- मेट्रो धावत असताना दरवाजा उघडण्यास भाग पाडू नका
- रेलींगवर झुकू नका
- मेट्रोचे दार बंद होत असताना मध्येच हात घालू नका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.