क्रेडीट कार्डची माहिती घेऊन फसवणूक
पुणे, ता. २२ ः बॅंकेच्या क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांनी एका नागरिकाची एक लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कात्रजमधील मांगडेवाडी येथील ४२ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यावरून चोरट्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर ३१ जानेवारीला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने ‘आपण नामांकित बॅंकेच्या क्रेडीट कार्ड विभागातून बोलत आहोत’ अशी बतावणी करून फिर्यादीशी संवाद साधला. त्यानंतर त्याने फिर्यादीला विविध कारणे सांगून त्यांच्याकडून त्यांच्या क्रेडीट कार्डची माहिती व गोपनीय क्रमांक घेतला. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. सायबर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.