वाहतूककोंडीने चालकांचे हाल
Sakal

वाहतूककोंडीने चालकांचे हाल

पुणे शहरात औत्सुक्याचा विषय ठरलेल्या मेट्रोच्या वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानचा ५ किलोमीटरचा मार्ग अवघ्या आठ दिवसांत प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे.
Published on
Summary

पुणे शहरात औत्सुक्याचा विषय ठरलेल्या मेट्रोच्या वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानचा ५ किलोमीटरचा मार्ग अवघ्या आठ दिवसांत प्रवाशांसाठी सज्ज होणार आहे.

पुणे - शहरात औत्सुक्याचा विषय ठरलेल्या मेट्रोच्या (Metro) वनाज-गरवारे महाविद्यालय दरम्यानचा ५ किलोमीटरचा मार्ग अवघ्या आठ दिवसांत प्रवाशांसाठी (Passenger) सज्ज होणार आहे. त्याचे औपचारिक उद्‍घाटन झाल्यावरच तो प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. त्याची महामेट्रोकडून तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. वनाजपासून (Vanaj) गरवारे महाविद्यालयापर्यंत (Garware College) मेट्रोतील प्रवाशांचा अवघ्या १३ मिनिटांत हा प्रवास पूर्ण होणार आहे.

या मेट्रो मार्गावरील वनाज, आयडियल कॉलनी, आनंदनगर, नळस्टॉप आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकांची अंतिम टप्प्यात आली आहे. गरवारे महाविद्यालयाचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले आहे. १५ जानेवारी दरम्यान पाचही स्थानकांची कामे पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना सक्रांतीपूर्वीच मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची गोड बातमी मिळाली आहे. तसेच मेट्रो मार्गाच्या सुरक्षिततेची रेल्वेचे सुरक्षा आयुक्त ११ आणि १२ जानेवारी रोजी पाहणी करणार आहेत. त्यानंतर मेट्रोचे उद्‍घाटन झाल्यावर प्रवाशांना प्रवास करता येईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक विनय अग्रवाल आणि प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली. मेट्रो मार्गाच्या उद्‍घाटनाचे नियोजन महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारस्तरावर होत आहे. मेट्रो स्थानकात तळमजल्यावर बस बे आणि रिक्षा स्थानक, पहिल्या मजल्यावर तिकिट काऊंटर आणि कॅफेटेरीया दुसऱ्या मजल्यावर दोन प्लॅटफॉर्म असतील.

स्थानकावर हेल्पलाईन

मेट्रो स्थानकावर प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर, लिफ्ट शेजारील बटण दाबल्यावर थेट स्टेशन कंट्रोलरकडे कॉल जाणार. त्यांच्याकडून फोन उचलला न गेल्यास मेट्रोच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात कॉल जोडला जाणार. म्हणजे प्रवाशांची एखादी वस्तू मेट्रोत राहिली तर, हेल्पलाईनद्वारे पुढील स्थानकावर मेट्रोचे कर्मचारी ती वस्तू ताब्यात घेऊन प्रवाशांना परत करू शकतील.

वाहतूककोंडीने चालकांचे हाल
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे ऑफलाइन वर्ग येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद

मार्गाची वैशिष्ट्ये...

  • वनाज-गरवारे महाविद्यालयदरम्यान दर २० मिनिटांना मेट्रो उपलब्ध

  • मेट्रोला तीन डबे, त्यातील एक महिलांसाठी राखीव

  • पहिल्या 3 किमीला १०, तर गरवारे महाविद्यालयापर्यंत २० रुपये भाडे

  • सुमारे १००० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील

  • प्रत्येक स्थानकाला दोन किंवा तीन प्रवेशद्वारे

  • स्‍थानकात दोन लिफ्ट, दोन सरकते जिने (एक्सलेटर)

  • प्रत्येक स्थानकासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च

  • स्थानकाची लांबी १४० मीटर, तर रुंदी २१ मीटर

  • व्हीलचेअरवरील प्रवाशांनाही प्रवास सहज करता येईल, अशी व्यवस्था

जाहिरातीतून उत्पन्न

मेट्रोच्या डब्यांवर जाहिरातींच्या माध्यमातून एका वर्षासाठी २५ लाख रुपयांचे जाहिरातीचे कंत्राट एका राष्ट्रीयीकृत बॅंकेबरोबर निश्चित झाले आहे, तसेच गरवारे महाविद्यालय स्थानकावर एका खासगी रुग्णालयाने ६५ लाख रुपयांना पाच वर्षांच्या जाहिरातीचे कंत्राट निश्चित केले आहे. नळस्टॉप स्थानकावरही एका खासगी संस्थेने ४५ लाख रुपयांचे जाहिरातीचे कंत्राट केले आहे. तिकिटातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मेट्रोचा खर्च वसूल होत नसल्याचे उत्पन्नाच्या अन्य स्रोतातून उत्पन्न मिळविण्याचे महामेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानकांवरही जाहिरातींसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले.

विमानतळापासून शटल सेवा

लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रोमार्ग तूर्त उपलब्ध नाही. त्यामुळे रामवाडी, येरवडा आणि कल्याणीनगर येथून प्रवाशांसाठी ‘पीएमपी’ची शटल बससेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवासी विमानतळावरून मेट्रोत जाऊ शकतील, तसेच या तिन्ही स्थानकांवरून प्रवाशांना विमानतळावर पोहचता येईल. त्यासाठी ‘पीएमपी’शी चर्चा पूर्ण झाली असून, डिसेंबरअखेर ही सेवा सुरू होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.