‘आयसर’ प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लागा कामाला
पुणे, ता. १५ ः तुमच्या पाल्याला जर संशोधनाची आवड असेल किंवा विज्ञानशाखेत पदवी संपादन करून आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) प्रवेश परीक्षेत नक्की सहभागी व्हा. विज्ञान शिक्षणासाठी नावाजलेल्या आयसरच्या प्रवेश परीक्षेची अर्थात आयएटी-२०२२ची घोषणा करण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे.
बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आयसरमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञान शिक्षणाबरोबरच संशोधनात्मक दृष्टिकोनात वाढ व्हावी म्हणून देशभरात सात आयसरची स्थापना करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या ‘बॅचलर इन सायन्स-मास्टर इन सायन्स’ (बीएस-एमएस) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. आयसर भोपाळमध्ये चार वर्षांचा अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्यासह ब्रह्मपूर, भोपाळ, मोहाली, कोलकता, तिरूअनंतपुरम, तिरुपती येथे आयसरचे संकुले आहेत.
प्रवेश परीक्षेची पात्रता
- बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाला किंवा उत्तीर्ण
- खुला आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आवश्यक
- एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील विद्यार्थ्याला ५५ टक्के गुण आवश्यक
प्रवेशाचे विविध मार्ग
१) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय)
२) आयआयटीच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ॲडव्हान्स
३) आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट (आयएटी)
(वरील क्रमानुसार प्रवेशाला प्राधान्य असणार आहे)
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज भरण्याची मुदत ः २५ एप्रिल ते २० मे
- प्रवेश परीक्षेची (आयएटी-२०२२) तारीख ः १२ जून
- संकेतस्थळ ः http://www.iiseradmission.in/
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.