घरात व्हेंटिलेशन मिळवण्यासाठी महिलेचा लढा घरा शेजारी चुकीचे बांधकाम होत असलेल्याची तक्रार; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
पुणे, ता. ७ ः घरा शेजारी चुकीच्या पद्धतीने बांधकाम होत असल्याने घरातील व्हेंटिलेशन कमी होत आहे, असा आक्षेप घेऊन एक महिला गेली चार महिने महापालिकेचे उंबरे झिजवत आहे. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात या महिलेला धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचाही प्रकार झाला. अखेर आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले व बांधकाम थांबविण्यासही सांगितले. मात्र, अद्यापही पुढील कार्यवाही झालेली नाही.
वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे त्रस्त झालेल्या संध्या देशमुख या महिलेने ‘सकाळ’च्या कार्यालयात येऊन कैफियत मांडली. देशमुख यांनी हिंगणे खुर्द येथील एका बांधकामासंदर्भात तक्रार केली आहे. २०१९ मध्ये महापालिकेची परवानगी न घेता हिंगणे येथील एक इमारत पाडण्यात आली. बांधकामाचे नकाशे नसतानाही नवे बांधकाम सुरू झाले. त्याबाबत तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर हे बांधकाम पाडून टाकले. गेल्या काही महिन्यांपासून तेथे नव्याने बांधकाम सुरू झाले. पण, ते नियमबाह्य असल्याने आम्हाला व्हेंटिलेशन मिळणार नाही, अशी तक्रार संध्या देशमुख यांनी केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले, त्यांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. याचा पाठपुरावा करण्यासाठी १७ मार्च रोजी आयुक्त कार्यालयात गेल्यानंतर आयुक्तांच्या स्वीय सहायकांनी सुरक्षा रक्षकांकरवी मला धक्काबुक्की करून बाहेर काढले. ही घटना आयुक्तांना कळाल्यानंतर आयुक्तांनी माझे म्हणणे ऐकून घेतले व बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिले. पण, अद्यापही त्यावर पुढील कार्यवाही झालेली नाही.
बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख म्हणाले, ‘‘बांधकामासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर केला जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.