crime
crimesakal

सराईत गुन्हेगारी टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

आत्तापर्यंत ‘मोका’ अंतर्गत ७७ कारवाया
Published on

पुणे - बिबवेवाडी परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) कारवाई केली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संबंधित ‘मोका’ कारवाईला मंजुरी दिली असून आत्तापर्यंत ‘मोका’ अंतर्गत ७७ कारवाया झाल्या आहेत.
गणेश बबन जगदाळे (वय २६, रा.चिंतामणी रेसीडेन्सी, सुखसागरनगर, बिबवेवाडी, मुळ रा. खासगाव, परांडा), गौरव वसंत बुगे (वय २०), शुभम प्रकाश रोकडे (वय २५), रोहित विजय अवचरे (वय २४), रोहन राजू लोंढे (वय २३), सौरभ दत्तु सरवदे (वय २२), बाब्या ऊर्फ आदित्य संजय नलावडे (वय २०, सर्व रा.पर्वती पायथा), आकाश सुरजनाथ सहाणी (वय २४), ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (वय २१), अनिस फारुक सय्यद (वय १९), आकाश सुरेश शिळीमपुर (वय २१ रा. जनता वसाहत), अजय कालिदास आखाडे (वय २२, रा. बनकर वस्ती, धायरीगाव), कुणाल रवी गायकवाड (वय २१, रा. वडगाव धायरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदाळे व त्याच्या साथीदारांनी ६ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील शिवशंकर गल्लीमध्ये गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करीत कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली होती. तर सौरभ सरवदे याने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणाच्या दिशेने गोळीबार करीत तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जगदाळे व त्याच्या साथीदारांना अटक केली होती.

या गुन्ह्याचा बिबवेवाडी पोलिस तपास करीत असतानाच जगदाळे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने संघटित गुन्हेगारी टोळी चालवीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापत, खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याविरुद्ध ‘मोका’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांनी पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.