जिल्हा बँकेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. नवनाथ निघोट

जिल्हा बँकेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. नवनाथ निघोट

Published on

मंचर, ता. १० : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. नवनाथ राजाराम निघोट यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ॲड. निघोट यांनी केलेल्या कामकाजाविषयी चर्चा झाली. त्यामध्ये शेती, बिगरशेती कर्ज पुरवठा अंतर्गत दाखल झालेली कर्ज प्रकरणे, तारण मालमत्तेचा सर्च व टायटल रिपोर्ट, गहाणखत तयार करणे, आदी कायदेविषयक कामकाजाचे मूल्यांकन बँकेने केले. त्यानंतर ॲड निघोट यांची आंबेगाव विभागासाठी नियुक्ती केल्याचे जिल्हा बँकेने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.