परदेशी चलन, दागिन्यांची चोरी
पुणे, ता. २५ : रेसकोर्स परिसरातील सोपानबागेतील एका बंगल्यातून चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन, हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ५८ वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका शाळेचे संस्थापक आहेत. घोरपडी गाव परिसरातील सोपानबागेत त्यांचा बंगला आहेत. त्यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहेत. त्यामुळे बंगल्यातील साहित्य वरच्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. बंगल्याचे नूतनीकरण कामगारांकडून करण्यात येत आहे. बंगल्यातील कपाटातून साडेचार लाख रुपयांचे परदेशी चलन आणि हिरेजडीत दागिने असा ऐवज लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले या चोरीचा तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.