Crime News
Crime Newsesakal

Pune Crime : भाडेतत्त्वावर घेतलेल्या महागड्या मोटारीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या नागपूरमधील चोरट्यांच्या टोळीला अटक

याबाबत एका टुरिस्ट व्यावसायिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीं सराईत गुन्हेगार आहेत.
Published on

Pune Crime - भाडेतत्त्वावर घेतलेल्या महागड्या मोटारीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या नागपूरमधील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक मोटार जप्त करण्यात आली आहे.
रोहित संदीप दरेकर, आकाश रावसाहेब पोटघन ऊर्फ भडांगे (दोघे रा. पुणे), गणेश रामलाल माळी, सौरभ विक्रम हावळे, मृणाल प्रकाश सोरदे, राकेश देवेंद्र पवार (सर्व रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत एका टुरिस्ट व्यावसायिकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींमधील दरेकर आणि भडांगे सराईत गुन्हेगार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरेकर हा १२ मे रोजी तक्रारदार टुरिस्ट व्यावसायिकाकडे भाडेतत्वावर मोटार घेण्यासाठी आला होता. व्यावसायिकाने त्याच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड पाहिले.

Crime News
Pune Corporation : पालिकेला टॅक्स हवाय! मग आधी द्या या सुविधा!

त्यानंतर त्याला नऊ दिवसांसाठी मोटार भाडेकरारावर दिली. मात्र, नऊ दिवसांनंतर दरेकर परतला नाही. संशय आल्याने टुरिस्ट व्यावसायिकाने दरेकरने दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा केली. तेव्हा कागदपत्रे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघडकीस आले.
याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन यांनी तांत्रिक तपास सुरू केला.

Crime News
Mumbai : मार्च महिन्यानंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारी ठाणे जिल्ह्यातील काही भागात आले धुळीचे वादळ

आरोपी दरेकरला शिरूर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार आकाश, गणेश आणि सौरभ हावळे यांच्याशी संगनमत करून मोटार चोरल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर आरोपींना नाशिक आणि शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी आरोपी सौरभ हावळे यांच्यामार्फत आरोपींनी मोटार नागपूर येथे विक्रीसाठी पाठवल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने सोरदे, पवार यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून मोटार जप्त केली. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, अविनाश शेवाळे, गिरीश नाणेकर, दादासाहेब बर्डे, सचिन जाधव आणि सचिन कदम यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.