साठीपार केलेल्या ''युवकां''ची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

साठीपार केलेल्या ''युवकां''ची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

Published on

पुणे, ता. २५ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या जनजागृतीसाठी वयाची साठी ओलांडलेले चौघे काश्मीर ते कन्याकुमारी अंतर सायकलवरुन पार करणार आहेत. श्रीनगरमधून आज (ता.२६) या यात्रेला सुरुवात होणार आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्या यात्रेविषयी माहिती दिली आहे.
पुण्यातील संजय कट्टी (वय ६५), मोनिश चक्रवर्ती (वय ५३) यांच्यासह डेहराडून येथील विश्व धीमान (वय ७०) आणि कमलजीत सिंग (वय ७५) सायकल यात्रा करणार आहेत. या यात्रेत श्रीनगर ते कन्याकुमारी हा ३,६९९ किलोमीटरचा प्रवास ते पूर्ण करतील. ''वय हा सायकलिंगसाठी फक्त एक आकडा आहे'', असा संदेश ते या ३३ दिवसांच्या यात्रेतून देणार आहेत. श्रीनगरमधील लाल चौकातून हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरवात होणार आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

"सायकल यात्रेदरम्यान जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या ११ राज्यांमधून प्रवास करणार आहे. दररोज सरासरी ११२ किलोमीटर सायकलिंग करण्याचे नियोजन आहे. ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त, आनंदी राहण्यासाठी आणि जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी प्रेरित करणे, हा आमचा मानस आहे" संजय कट्टी, पुणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.