योग आणि आहारावरील ‘रेड्यूस’ पुस्तकाचे प्रकाशन

योग आणि आहारावरील ‘रेड्यूस’ पुस्तकाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. २६ : डॉ. सुनंदा राठी आणि आशिष राठी लिखित ‘रेड्यूस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ९७ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, राष्ट्रीय युवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिषद सदस्य राजेश पांडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

शोभणे म्हणाले, ‘‘डॉ. सुनंदा राठी आणि आशिष राठी लिखित मुलांचा लठ्ठपणा रोखण्यासाठी, खोल अभ्यासावर आधारित! एक सल्ला ‘रेड्यूस’ हे पुस्तक आपल्या भारतीय प्राचीन विज्ञान योगावर आधारित आहे. जे केवळ लठ्ठपणा रोखण्यासाठी नाही तर आपले शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहे. हे पुस्तक मुलांसाठी, तरुणांसाठी, पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त आहे.’’ लठ्ठपणा रोखण्यासाठी कोणत्याही औषधाची किंवा शस्त्रक्रियेची गरज नसून, तुम्ही योगासन करण्यासाठी दररोज ४५ ते ६० मिनिटे वेळ काढल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. लठ्ठपणा ही जागतिक समस्या आहे, जी आमच्या भारतीय प्राचीन विज्ञानाद्वारे सोडवली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.