DSK case loan money is not received
DSK case loan money is not receivedSakal

DSK : मुदत संपल्यानंतरही कर्जरोख्यांचे पैसे मिळेना

गुंतवणूकदारांची दैना : ‘डीएसकेडीएल’चा पहिलाच हप्ता मिळण्यास उशीर
Published on

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची ‘डीएसकेडीएल’ कंपनी विकत घेताना सादर केलेल्या प्रस्तावानुसार अद्याप कर्जरोख्यांना पहिल्या टप्प्यातील पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे गुतंवणूक केलेली रक्कम परत मिळण्यासाठी २०१९ पासून सुरू झालेले डिबेंचर होल्डरचे (कर्जरोखे) प्रयत्न सुरूच आहे.

‘डीएसकेडीएल’ कंपनी विकत घेताना ‘अजदान प्रॉपर्टीज प्रा. लि.’ने कर्जरोख्यांचे १६१ कोटी रुपये देवू असा प्रस्ताव (रिझोलेशन प्लॅन) दिला होता. त्याच्या प्रस्ताव मंजूर झाल्यास ९० दिवसांत कर्जरोख्यांचा पहिला हप्ता देवू, असे ‘अजदान’ने नमूद केले होते. हा हप्ता एकूण गुंतवणुकीच्या ८.४ टक्के असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

त्यामुळे २२ सप्टेंबरपूर्वी पहिला हप्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र त्याची मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकदारांना पैसे आलेले नाहीत. त्यामुळे कर्जरोखे हवालदील झाले आहेत. ‘डीएसकेडीएल’ हस्तांतरित झाल्यानंतर झालेल्या करारानुसार सुमारे दीड हजार ठेवीदारांना चार कोटी ६८ लाख रुपये परत मिळाले आहेत. मात्र, भागीदारी संस्थांचे ठेवीदार अजूनही वाऱ्यावरच आहेत.

१६१ कोटी रुपये मिळणार
‘डीएसकेडीएल’मधील कर्जरोख्यांचे एकूण १६१ कोटी रुपये परत मिळणार आहेत. गुंतवणुकदारांनी एकूण ११० कोटी रुपये कर्जरोख्यांच्या माध्यमातून ‘डीएसकेडीएल’मध्ये गुंतवले होते. २०१९ पर्यंत त्याचे व्याजासह १६१ कोटी रुपये झाले आहेत. ते सर्व पैसे पुढील सात वर्षांत परत केले जाणार आहेत, असे अहवालात नमूद आहे.

बँक खाते तपासण्यासाठी एक रुपया
कर्जरोख्यांची विविध प्रकारच्या बँक खात्यांची माहिती ‘अजदान’कडे आहे. त्या खात्यांची खात्री करण्यासाठी ‘अजदान’कडून गेल्या काही दिवसांपूर्वी प्रत्येक खात्यात एक रुपया पाठविण्यात आला होता. हा एक रुपया कर्जरोख्यांना मिळाला की नाही याची पडताळणी करण्यासाठी त्यांना मेल देखील करण्यात आले होते.

अशी आहे स्थिती
एकूण कर्जरोखे - ८१२५
त्यांनी केलेली गुंतवणूक - ११० कोटी
प्रस्तावात मंजूर कर्जरोख्यांची रक्कम - १६१ कोटी

कर्जरोख्यांना दिलासा मिळण्यासाठी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार त्वरित पैसे देण्यात यावेत. याबाबत आम्ही सेबीने नेमून दिलेल्या ट्रस्टकडे सातत्याने चौकशी करीत आहोत. पहिलाच हप्ता मिळण्यासाठी उशीर झाला आहे. त्यामुळे यापुढे पैसे वेळेत मिळणार का? गुंतवणुकदारांना आणखी किती वाट बघावी लागणार? असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतात. गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना पैशांसाठी आणखी वाट पाहायला लावू नये.
- संजय आश्रित, ठेवीदारांचे सनदी लेखापाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.