स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय

स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद शाश्वत पर्याय

Published on

पुणे, ता. ७ : ‘‘आयुर्वेदासह इतर भारतीय चिकित्सा पद्धतींचे महत्त्व अनेकदा अधोरेखित झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आयुर्वेदाला, भारतीय पारंपरिक चिकित्सेला प्रोत्साहन दिले आहे. स्वास्थ्यपूर्ण जगासाठी आयुर्वेद हा शाश्वत पर्याय असून, त्याला लोकाभिमुख करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत,’’ असे मत आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधक प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील श्री सद्‍गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्रातर्फे आयोजित श्री विश्व व्याख्यानमाला व सातव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे उद्‍घाटन डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार उल्हास पवार, ‘इस्कॉन’चे सुंदरवर दास, भारतीय चिकित्सापद्धती राष्ट्रीय आयोगाच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, ट्रस्टचे अध्यक्ष श्री सद्‍गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, मुख्य चिकित्सक व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी, श्री विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदास सांगवडेकर, श्री धूतपापेश्वरचे रणजित पुराणिक, बैद्यनाथचे सिद्धेश शर्मा आदी उपस्थित होते. या वेळी ‘वागभट दीपिका’ व ‘आयुर्वेदीय औषधी द्रव्य शोधनविधी’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये भेदभाव नाही. संशोधन, नवोन्मेष करून आयुर्वेद अधिकाधिक विकसित व समृद्ध करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.’’
याप्रसंगी आयुर्वेदामध्ये अनेक पिढ्यांपासून योगदान देणाऱ्या आयुर्वेदाचार्यांचा सन्मान करण्यात आला. सुंदरवर दास, रणजित पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. निरंजनदास सांगवडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.