auto Expo
auto Expo sakal

Pune News : ऑटो एक्स्पोला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

आज शेवटचा दिवस, एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध
Published on

पुणे - नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सणासुदीच्या मुहूर्तावर नागरिकांना एकाच छताखाली सर्व पर्याय उपलब्ध व्हावे म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दोन दिवसीय ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे.
कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये शनिवारी पार पडलेल्या उद्‍घाटन कार्यक्रमाला पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेला ‘ऑटो एक्स्पो’ पुणेकरांसाठी फायद्याचा आहे. कारण, एकाच छताखाली सर्व पर्याय, टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध झाले आहेत. एक्स्पोमध्ये डिझेल, पेट्रोलबरोबरच इलेक्ट्रीक, सीएनजी वाहने उपलब्ध असल्याने नक्कीच नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
- संजीव भोर,
पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी

नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिक वाहनांची खरेदी करतात. सणांच्या अगदी सुरूवातीलाच हा एक्स्पो असल्याने नागरिकांना अद्ययावत आणि स्वतःच्या गरजेनुसार वाहन खरेदी करता येणार आहे. आपल्या आवडीच्या ब्रॅंडसह विविध पर्याय नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध असून, प्रतिसादही चांगला आहे.
- अनिकेत गारवे,

पहिल्या दिवसापासूनच ग्राहकांनी एक्स्पोला चांगला प्रतिसाद दिला आहे. डिझेल, पेट्रोलबरोबर इंधनाचे विविध पर्याय आणि तंत्रज्ञान असलेली वाहने ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ‘लेक्सस’ म्हणून आम्ही हायब्रीड चारचाकींचा पर्याय उपलब्ध करत असून, ज्यात इलेक्ट्रीक आणि पारंपारिक इंधनाचा पर्याय आहे.
प्रविण भालेराव, लेक्सस रिलेशनशिप मॅनेजर

auto Expo
Pune News : विद्यार्थी वाहतूक वाहनांना मिळावेत परवाने; वाहनचालक आणि व्यावसायिकांची अपेक्षा

दोन वर्षांपासून ‘सकाळ’ ऑटो एक्स्पो घेत आहे. एकाच छताखाली सर्व गाड्या बघण्याचा हा सर्वोत्तम पर्याय असल्यामुळे आम्हीही यात जोडले गेलो असून, पुणेकरांनी नक्की या ऑटो एक्स्पोचा फायदा घ्यायला हवा.
चैतन्य सिन्नरकर, संचालक, अरिहान सुझुकी

auto Expo
Nagpur News : आरयूबीसह होणार दोनशे कोटींची कामे; केंद्रीय मंत्री गडकरी नाईक तलाव भुयारी मार्गाचे भूमिपूजन

‘श्यामची आई’ चित्रपटाची स्टारकास्ट
रविवारी (ता. १५) दुपारी चार वाजता ‘रौद्र’ व ‘सुभेदार’ आणि आगामी ‘श्यामची आई’ चित्रपटातील अभिनेत्री ऊर्मिला जगताप या प्रदर्शनाला भेट देणार आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी हा मराठी चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

‘एक्स्पो’बाबत....
कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर
कधीपर्यंत : रविवार (ता. १५)
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
सुविधा ः प्रवेश व पार्किंग मोफत
सवलत ः फायनान्स आणि एक्स्चेंज ऑफर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.