mhada homes
mhada homesesakal

Atul Save : वर्षभरात एक लाख घरे देण्याचे उद्दिष्ट - अतुल सावे

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे; ‘म्हाडा’ची सोडत जाहीर
Published on

Pune News : म्हाडाच्या माध्यमातून येत्या वर्षभरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे १ लाख कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्‍वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी दिले. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सदनिका संगणकीय सोडत समारंभ सावे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ते बोलत होते.

सावे म्हणाले, ‘‘राज्य व केंद्र सरकार मिळून पंतप्रधान आवास योजनांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून देत आहे. पुणे म्हाडाच्या आजच्या सोडतीत उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले.

म्हाडाकडून आत्तापर्यंत ५ लाख १४ हजार नागरिकांना घरे उपलब्ध करून दिली गेली.’’ या वेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त सौरभ राव,

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते.

घरांची सोडत यापुढे वर्षातून दोनदा घेण्यासाठी म्हाडाने प्रयत्न करावेत, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अधिकाधिक नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी प्रयत्न करावेत, पुणे विभागात विविध गृहनिर्माण योजनेकरिता शासकीय भूखंड उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी गती देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही सावे यांनी या वेळी केल्या. या वेळी सावे यांच्या हस्ते विजेत्यांना निकालपत्रे देण्यात आली.

mhada homes
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : ज्येष्ठ नागरिकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

जयस्वाल म्हणाले, ‘‘म्हाडाच्या वतीने सुमारे ९ लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे. पुणे म्हाडाच्या वतीने विविध उत्पन्न गटातील सुमारे ३५ हजार सदनिका, ७ हजार ८०० भूखंड आणि ७५५ गाळे वितरित करण्यात आले.

सद्यःस्थितीत विविध योजनेअंतर्गत ३ हजार ७४० सदनिकांची निर्मिती प्रगतिपथावर आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने गती देण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे.’’

mhada homes
Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी

सोडतीचा तपशील

पुणे म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी ५९ हजार ३५० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या ४०३ घरांसाठी १ हजार ७२४, प्रधानमंत्री आवास योजना ४३१ घरांसाठी २७०, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना २ हजार ५८४ घरांसाठी ५६ हजार ९४१ आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यसाठी

(म्हाडा गृहनिर्माण योजना) २ हजार ४४५ घरांसाठी ४१५ अर्ज प्राप्त झाले. सोडतीचा निकाल म्हाडाच्या संकेतस्थळावर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला किंवा कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन ‘म्हाडा’ने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.