Student New Education Policy
Student New Education PolicySakal Digital

पुणे : विद्यार्थ्यांनो लक्ष असू द्या! येत्या शैक्षणिक वर्षात नवा अभ्यासक्रम, महत्त्वाचे काय?

पारंपारिक अभ्यासक्रमांतील पदवीत ६० टक्के श्रेयांक (क्रेडीट) हे मुख्य विषयाचे आणि ४० टक्के श्रेयांक हे कौशल्याधारित विषयांचे असणार आहे
Published on
Summary

महाविद्यालयांना आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करायचा आहे. ज्यामध्ये कौशल्य आणि मुल्याधारित अभ्यासक्रमांबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवाचाही समावेश आहे.

New Education Policy Savitribai Phule Pune University

पुणे : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आता सज्ज झाले आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून संलग्न महाविद्यालयांत लागू होणाऱ्या या धोरणासाठीचा नवा अभ्यासक्रम तयार झाला आहे. दिवाळीनंतर अर्थात १५ नोव्हेंबरनंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम घोषित करण्यात येणार आहे.
संपूर्ण राज्यातच अपुऱ्या तयारीमुळे संलग्न महाविद्यालयांत पदवी स्तरावरील एनईपीची अंमलबजावणी एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम सुरू होत आहे. राज्य सुकाणू समितीने दिलेला आराखडा विद्यापीठाने जुलैमध्येच स्वीकारला होता. सप्टेंबर महिन्यातच त्याला विद्यापरिषदेने मंजुरी दिली होती. आराखड्याच्या पुढे जात अभ्यासमंडळांनी पदवीच्या प्रथम वर्षासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार केला आहे. लवकरच तो विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल, त्यानंतर आलेल्या सूचनांच्या आधारे आवश्यक ते बदल केले जाणार आहे. त्यामुळे एक वर्ष उशिरा का होईना, विद्यार्थ्यांना नवा अभ्यासक्रम मिळत आहे.

Student New Education Policy
Nashik News: वारसा हक्काने नोकरी देण्यावर दिवाळीनंतर निर्णय; पालकमंत्र्याचे आश्‍वासान

प्राध्यापकांची कार्यशाळा...
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे अभ्यासक्रम घोषित झाल्यावर प्राध्यापकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातील, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘लवकरच विद्यापीठस्तरावर विषय शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. अभ्यासमंडळांना प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीचीही पुर्तता करण्यात आली आहे. अभ्यासक्रम संकेतस्थळावर उपलब्ध झाल्यानंतर येणाऱ्या सूचनांचा विचार करून आवश्यक ते बदल केले जातील.’’

पदवीसाठी ६०-४०चे सूत्र
पारंपारिक अभ्यासक्रमांतील पदवीत ६० टक्के श्रेयांक (क्रेडीट) हे मुख्य विषयाचे आणि ४० टक्के श्रेयांक हे कौशल्याधारित विषयांचे असणार आहे. महाविद्यालयांना आता चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम प्रदान करायचा आहे. ज्यामध्ये कौशल्य आणि मुल्याधारित अभ्यासक्रमांबरोबरच प्रत्यक्ष कार्यानुभवाचाही समावेश आहे. त्यामुळे ४० श्रेयांकांसाठीचे वैकल्पिक विषय अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

१) असे असतील श्रेयांक
तपशील ः तीन वर्षांची पदवी ः चार वर्षांची पदवी
किमान ः १२० ः १६०
कमाल ः १३२ ः १७६

२) एका वर्षासाठीचे श्रेयांक
किमान ः ४०
कमाल ः ४४

महत्त्वाचे काय?
- येत्या शैक्षणिक वर्षात पदवी चार वर्षांची असले
- चारही वर्षांचा आराखडा आणि पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम तयार झाला आहे
- पुढील सहा महिन्यात प्राध्यापकांचे प्रशिक्षण आणि सूचनांच्या आधारे आवश्यक बदल केले जाणार
- पारंपारिक पदवी करतानाही विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घेता येईल

नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. नव्या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्राचार्यांची विद्यापीठ पातळीवर लवकरच बैठक पार पडेल.
- डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Student New Education Policy
Pune News : उच्च शिक्षण सहसंचालकांच्या बदल्या; पुणे विभागाचा कार्यभार डॉ. केशव तुपे यांच्याकडे

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील प्रथम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे. आराखड्यापासून ते मुल्यमापनापर्यंतचे सर्व मे आता पूर्ण झाली आहेत. दिवाळीनंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.