स्वमग्न मुलांच्या उपचारात 
पालकांचा सहभाग हवा 

बालविकास तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांचे मत

स्वमग्न मुलांच्या उपचारात पालकांचा सहभाग हवा बालविकास तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांचे मत

Published on

पुणे, ता. ३ : ‘‘स्वमग्न मुलांचे उपचार घाटाच्या चढत्या रस्त्याप्रमाणे असतात. ‘थांबू नका, सावकाश जा, संयम ठेवा’ हा मंत्र या उपचारात पालकांनी आवर्जून लक्षात ठेवला पाहिजे. त्यातून नक्की यश मिळेल,’’ असा विश्वास स्मॉल टेप्स मॉरिस स्वमग्नता केंद्राचे प्रमुख आणि बालविकास तज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी व्यक्त केला.

स्मॉल स्टेप्स मॉरिस स्वमग्नता व बालविकास केंद्र, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सुंदरजी ग्लोबल ॲकेडेमिया, भारतीय बालविकास संघटना आणि बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या पुणे शाखेतर्फे जागतिक स्वमग्नता दिन साजरा केला. यावेळी ते बोलत होते. दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. डॉ. संयोगिता गिरमे, बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. शिल्पा दुधगावकर, सचिव संदेश रुणवाल उपस्थित होते.

डॉ. गोडबोले म्हणाले, ‘‘स्वमग्न मुलांचे पालकच आपल्या मुलांसाठी सर्वांत चांगले थेरपिस्ट होऊ शकतात.’’ संयोगिता गिरमे यांनी वैदेही दत्ताजी गायकवाड यांच्या अर्थसहाय्यातून स्मॉल स्टेप्स मॉरिस स्वमग्नता केंद्रात सुरू झालेल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सध्या शिक्षण घेत आहे. या कार्यक्रमात चाळीसहून अधिक स्वमग्न मुलांनी अंगभूत कौशल्ये सादर केली. यात योगासने, सूर्यनमस्कार, श्लोक पठण, संगीत आणि नृत्य यांचा समावेश होता. परिश्रम, संयम आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांनी एकत्र येऊन कार्य केल्यास स्वमग्न मुले यशस्वी होऊ शकतात. हा संदेश यातून दिला. सुंदरजी शाळेच्या संचालिका मसरत तवावाला यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.