‘डॉ. आंबेडकर यांचा पहिला पुतळा
बागल यांनी कोल्हापुरात उभारला’

‘डॉ. आंबेडकर यांचा पहिला पुतळा बागल यांनी कोल्हापुरात उभारला’

पुणे, ता. २ : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतातील अनेक शहरांप्रमाणे जगातही अनेक पुतळे उभारले गेले. परंतु त्यांचा जगातील पहिला पुतळा थोर समाजसुधारक, सत्यशोधक भाई माधवराव बागल यांनी कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात ९ डिसेंबर १९५० रोजी उभारला,’’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी येथे केले.

पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन यांच्यातर्फे फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा होते तर निमंत्रक म्हणून असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे होत्या. या प्रसंगी डॉ. कोकाटे म्हणाले, ‘‘महात्मा फुले यांनी सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. सर्वांगीण विकासासाठी लिंगभेद न करता महिलांना, तृतीयपंथीयांना समान संधी दिली पाहिजे, असे फुलेंचे विचार होते. डॉ. आंबेडकरांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांना गुरू मानले. डॉ. आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी विद्वता व्यक्तिगत हितासाठी नव्हे, तर लोककल्याणासाठी समर्पित केली. ते प्रतिमाप्रेमात न अडकता जनतेच्या उद्धारासाठी सतत संघर्ष करत राहिले.’’ ‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा प्रथमत: डॉ. आंबेडकरांनी दिली, असेही त्यांनी सांगितले. ॲड. प्रगती पाटील यांनी आभार मानले, तर ॲड. विजय सरोदे यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com