जुने कपडे खरेदीच्या बहाण्याने 
चोरी करणाऱ्या महिलांना अटक

जुने कपडे खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या महिलांना अटक

Published on

पुणे, ता. १७ : जुने कपडे खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या गुजरात राज्यातील दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मोबाईल आणि २० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मीराबेन सोळंकी (वय ३५) आणि गीता कांगिया (वय ४५, दोघी रा. सासवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्या मूळच्या गुजरात राज्यातील साबरमती येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल कॉलनी परिसरात २५ जून रोजी सायंकाळी दोन अनोळखी महिला जुने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने फिरत होत्या. फिर्यादी महिलेने त्यांना जुने कपडे देण्यासाठी घरी बोलावले. त्यावेळी आरोपी महिलांनी त्यांना भूक लागल्याचे सांगत जेवण मिळेल का, असे विचारले. त्यावेळी फिर्यादी महिलेने त्यांना जेवण दिले. जेवण करीत असताना त्या महिलांनी घराची रेकी केली. फिर्यादी घराबाहेर गेल्यानंतर त्यांनी घरातून सोन्याच्या दोन अंगठ्या, मोबाईल आणि रोख ६० हजार रुपये चोरून नेले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सायबर गुन्हे विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव नाईक, पोलिस उपनिरीक्षक निसार शेख, पोलिस हवालदार रुपेश वाघमारे, पोलिस अंमलदार आदेश चलवादी आणि रुचिका जमदाडे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. आरोपी महिलांना सासवड येथून ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.