TET Case : टीईटी गैरप्रकारातील उमेदवारांना अपात्र करण्याची मागणी
पुणे : राज्यात २०१९ व २०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) परीक्षेत अपात्र करण्यात यावे, तसेच त्यांना शिक्षक भरती पोर्टलवर नोंदणी करण्यास बंदी घालावी, अशी मागणी डी. टी. एड, बी. एड. स्टुडंट असोसिएशनने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
२०१९-२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकारासंदर्भात सुमारे सात हजार ८८० उमेदवारांनी गैरप्रकार केला आहे, असे तपासणीत समोर आले. त्यानुसार गैरप्रकारातील उमेदवारांची परीक्षेतील गुण रद्द करून पुढील पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे.
परंतु, तरीही २०२३ मध्ये घेतलेली शिक्षक अभियोग्यता परीक्षा व बुद्धिमापन चाचणी परीक्षा या उमेदवारांनी दिली आहे. हे उमेदवार शिक्षक होण्यास पात्र नसून त्यांना शिक्षक भरती पोर्टलवर नोंदणी करण्यास बंदी घालावी, अशी मागणी असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष मगर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.