Adhik Maas 2023 : चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ‘पीएनजी सन्स’तर्फे विशेष सूट
पुणे : अधिक मासाचे औचित्य साधून ‘पीएनजी सन्स’ने चांदीच्या वस्तू, पैंजण, जोडवी, छल्ले आदींची पारंपरिक व अँटिक डिझाईन्स उपलब्ध केली असून, चांदीच्या वस्तूंच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिन्यात दान करण्यास, पूजनास आणि त्याचबरोबर चांदीलाही महत्त्व आहे. तसेच, वैदिक परंपरेत नवदाम्पत्यास लक्ष्मी-नारायणाचे प्रतीक मानण्यात आले आहे.
त्यामुळे जावयाचा व सुनेचा विशेष मानसन्मान असतो. पारंपरिक असणारा दागिन्यांचा प्रकार आता फॅशनचाही भाग बनत चालला आहे. त्यामुळे डिझायनर पैंजण व जोडवी यांना मागणी वाढत आहे. यामुळे अधिक मासाचे महत्त्व लक्षात घेऊन ‘पीएनजी सन्स’ने चांदीची पैंजण व जोडवी यांची विविध डिझाइन उपलब्ध केली आहेत.
‘पीएनजी सन्स’चे ‘सीएमओ’ आदित्य मोडक म्हणाले, ‘‘विवाहित स्त्रिया विशेष करून अधिक मासात प्रथेनुसार नवीन जोडवी, पैंजण घेतात. चांदीमध्ये पारंपरिक, कंटेम्पररी व अँटिक डिझाईन असणारे दिव्यांचे विशेष कलेक्शन दालनात उपलब्ध आहे.
ग्राहकांना अधिक मासनिमित्त मनपसंत खरेदी करता यावी यासाठी चांदीत नावीन्यपूर्ण वस्तूंचे प्रकार महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरातमधील आमच्या २९ दालनांत उपलब्ध आहेत. तसेच, येत्या १६ ऑगस्टपर्यंत त्यावरील घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.