pune rain update monsoon 184 mm less than average rainfall in Pune
pune rain update monsoon 184 mm less than average rainfall in Punesakal

Pune Rain News : पावसाची तूट वाढली; पुण्यात सरासरीपेक्षा १८४ मिलिमीटर कमी पाऊस

दडी मारणाऱ्या मॉन्सूनमुळे पुण्यातील पावसाची तूट दिवसेंदिवस वाढत आहे.
Published on

पुणे : दडी मारणाऱ्या मॉन्सूनमुळे पुण्यातील पावसाची तूट दिवसेंदिवस वाढत आहे. आजवर ४९२ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षीत असताना फक्त ३०८ मिमी पाऊस पडला असून, अजूनही १८४ मिमी पावसाची तूट कायम आहे. ऑगस्टमध्ये सुटीवर गेलेला पाऊस अजूनही परतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा १७ टक्के कमी पाऊस पडला असून, यातील बहुतेक पर्जन्यमान घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये झाले आहे. उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जास्त तूट आहे. पुढील काही दिवसांत राज्यात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता असून, त्यानंतर तरी जिल्ह्यात चांगला पाऊस पडेल, अशी अपेक्षा पुणेकरांसह बळिराजा व्यक्त करत आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली होती. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यात आकाश मुख्यतः ढगाळ आणि दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यातील हवामान
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. मात्र ओडिशा आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून बिकानेर, गुणा, मंडला, रायपूर, कलिंगापट्टनम ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.

गुरुवारी (ता. ७) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()