Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsakal

Pune News : पुणे महापालिकेत समाविष्ट नऊ गावांमध्ये कामाला गती

पुणे महापालिकेत समाविष्ट नऊ गावांमध्ये १८२ किलोमीटरच्या मैलापाणी वाहिन्या टाकण्यापासून ते मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंतच्या कामाला चालना मिळाली आहे.
Published on

पुणे - महापालिका प्रशासनाकडून समाविष्ट २३ गावांच्या विकासाबाबत एकीकडे कमालीची उदासीनता असली, तरी त्यापूर्वी समाविष्ट झालेल्या फुरसुंगी व देवाची उरुळी गावे ही दोन गावे वगळून उर्वरित नऊ गावांमध्ये १८२ किलोमीटरच्या मैलापाणी वाहिन्या टाकण्यापासून ते मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पापर्यंतच्या कामाला चालना मिळाली आहे. मागील वर्षी सुरु झालेले हे काम ३३ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाल्याची सद्य:स्थिती आहे. त्यामुळे किमान नऊ गावांच्या विकासाला काही प्रमाणात गती मिळू लागल्याची चिन्हे आहेत.

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये वाढ होऊन २०१७ मध्ये शिवणे, उत्तमनगर, धायरी, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, उंड्री, मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरा नळी), लोहगाव (उर्वरित), फुरसुंगी व देवाची उरुळी या ११ गावांचा महापालिकेमध्ये समावेश करण्यात आला होता. त्यापैकी फुरसुंगी व देवाची उरुळी या दोन गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी ही दोन गावे महापालिकेतून वगळली. दरम्यान, महापालिका प्रशासनाने जून २०१६ मध्ये ९ समाविष्ट गावांच्या मलनिस्सारण व्यवस्थेसाठी सल्लागार नेमून मास्टर प्लान केला. त्यानुसार, संबंधित गावांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यासाठी ३९२ कोटी रुपयांचे कामे प्रस्तावित केली होती.

Pune Municipal Corporation
Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला

जानेवारी २०२१ मध्ये ३९२ कोटी रुपयांच्या पुर्वगणकपत्रास मान्यता दिली. त्यामध्ये नवीन मुख्य मलवाहिन्या टाकणे, सध्याच्या मलवाहिन्यांची दुरुस्ती आणि मैलापाणी शुद्धीकरण केंद्र तयार करणे अशा स्वरूपाच्या कामांचा समावेश केला होता. २०२१ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून मागील वर्षी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. लोहगाव, धायरी, मुंढवा केशवनगर, आंबेगाव बुद्रुक, मांजरी येथे प्रत्यक्षात मलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. १८२ किलोमीटर मैलापाणी वाहिन्या टाकण्याच्या कामापैकी २८ किलोमीटरचे काम झाले आहे, त्यासाठी आत्तापर्यंत ३० कोटी रुपये इतका खर्च आला आहे. मागील वर्षभरात ही कामे सुमारे ३३ टक्के इतक्‍या प्रमाणात झाली आहेत.

चार वर्षात पूर्ण करणार काम

मुंढवा केशवनगरमध्ये सर्व्हे क्रमांक ९ ते १२ मध्ये १२ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठीची जागा ताब्यात घेतली आहे. तर मांजरी बुद्रुक येथे सर्व्हे क्रमांक २८ मध्ये ९३.५ एमएलडी इतक्‍या क्षमतेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधले जाणार आहे. मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेण्याचे काम सध्या सुरु आहे. या प्रकल्पासाठी २०२२-२३ च्या अंदाजपत्रकामध्ये १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून ठेवली आहे. हे काम चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

Pune Municipal Corporation
Triple Talaq : ट्रिपल तलाकप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

मैलापाणी वाहिन्या/केंद्र - किलोमीटर - कामासाठीची रक्कम

मलवाहिन्या टाकणे - १११ - १००.६३

नवीन मुख्य मलवाहिन्या टाकणे - ५७ - १०१.०८

सध्याच्या मलवाहिन्या सुधारणे - १४ - १३.३७

मांजरी बु.केशवनगर मैलापाणी शुद्धीकरण केंद्र - १०५.५ (एमएलडी) १७७.८८

एकूण ३९२.९६

महापालिकेत समाविष्ट ११ पैकी ९ गावांमध्ये मैलापाणी वाहिन्यांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ९ गावांमध्ये आत्तापर्यंत ३३ टक्‍क्‍यांपर्यंत काम झाले आहे. उर्वरित कामही सुरु आहे.

- जगदीश खानोरे, अधिक्षक अभियंता, जायका, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.