weather update rain forecast Dr. Ramchandra Sable Advise not to sow unless the soil is moist
weather update rain forecast Dr. Ramchandra Sable Advise not to sow unless the soil is moistsakal

Rain Update : राज्यात यंदा सरासरीच्या ९५ टक्के पाऊस

डॉ. रामचंद्र साबळे : जमिनीत ओलावा आल्याशिवाय पेरणी न करण्याचा सल्ला
Published on

पुणे : यंदा राज्यात मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) या कालावधीत सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून, या अंदाजात ५ टक्के कमी-जास्त इतकी तफावत होऊ शकते. तर मध्य आणि पूर्व विदर्भ वगळले तर उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी पडेल.

त्यामुळे कमी पावसाच्या पट्ट्यातील कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये येणारी पिके घेण्यावर भर द्यावा, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आणि ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

weather update rain forecast Dr. Ramchandra Sable Advise not to sow unless the soil is moist
Pre-Monsoon Rain : मान्सूनपूर्व पावसाने कारल्याची बाग भुईसपाट; उत्तरपूर्व भागात गारासह वादळी पाऊस

मॉन्सूनची राज्यातील व जिल्ह्यातील स्थिती तसेच याच्या आधारावर कृषी क्षेत्रातील नियोजन याबाबत डॉ. साबळे यांनी माहिती दिली. स्थानिक ठिकाणच्या ‘पाऊस अंदाज’ या मॉडेलच्या आधारावर त्यांनी ही माहिती दिली आहे.

हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या घटकांवर आधारित आहे. या वेळी डॉ. साबळे म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

जिल्ह्यात सरासरीपेक्षा ९४ टक्के पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे पाण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानबदलाचा परिणाम मॉन्सूनवरही होताना दिसून येत आहे. यंदा उन्हाळी हंगामात अवकाळी पाऊस झाल्याने हंगामात कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंशांनी कमी होते. यंदा राज्यात १० जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.’’

असा आहे अंदाज
- मॉन्सून दरम्यान ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस
- यंदा कमी कालावधीत अधिक पावसाची शक्यता
- बंगालच्या उपसागरातील मॉन्सूनची शाखा जास्त सक्रिय होण्याची चिन्हे
- अरबी समुद्रातील शाखा सर्वसाधारण राहणार

weather update rain forecast Dr. Ramchandra Sable Advise not to sow unless the soil is moist
Pune Rain Update : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची बॅटिंग

शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
यंदा सरासरी व त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकेल. मॉन्सूनदरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा खरिपाचे पीक नियोजन करताना काळजी घ्यावी.

पुरेसा पाऊस पडून जमिनीत ओलावा येईपर्यंत पेरणीला सुरुवात करू नये. शेतकऱ्यांनी पाणी साठविण्यावरही विशेष भर द्यावा. त्यासाठी चार ते पाच ओळींनंतर एक सरी पाडून त्यामध्ये पावसाचे पाणी मुरेल, असे नियोजन करावे. उतारास आडवी पेरणी करावी. तसेच मुख्य पिकाबरोबरच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असेही डॉ. साबळे या वेळी म्हणाले.

weather update rain forecast Dr. Ramchandra Sable Advise not to sow unless the soil is moist
Pune Rain : पुण्यात सलग तीन दिवस पूर्व मोसमी पावसाची हजेरी

जून ते सप्टेंबरमधील पावसाची स्थिती
ठिकाण सरासरी पाऊस (मिलिमीटरमध्ये) अंदाज (मिलिमीटरमध्ये) सरासरीची टक्केवारी
पुणे ५६६ ५३२ ९४
राहुरी ४०६ ३७७ ९३
कराड ५७० ५३० ९३
सोलापूर ५४३ ५०४ ९३
कोल्हापूर ७०६ ६७० ९५
पाडेगाव ३६० ३३४ ९३
निफाड ४३२ ४१२ ९८
धुळे ४८१ ४४७ ९३
जळगाव ६४० ५९४ ९३
परभणी ८१५ ७५८ ९३
दापोली ३३३९ ३९३८
९४
नागपूर ९५८ ९५८ १००
यवतमाळ ८८२ ८८२ १००
अकोला ६८३ ६३५ ९३
सिंदेवाही (चंद्रपूर) ११९१ ११९१ १००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()