जी २० च्या पार्श्वभूमिवर पुण्यात ‘युनिव्हर्सिटी २०’ परिषदेचे आयोजन
पुणे, ता. १० ः सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युनिव्हर्सिटी २०’ या परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद ‘जी-२०’च्या पार्श्वभूमिवर पुण्यात होणार आहे, अशी माहिती सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर आणि प्रा. अनिता पाटणकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. येरवडेकर म्हणाल्या, ‘‘विद्यापीठांचे भविष्य-जगाला जगण्यासाठी एक चांगले ठिकाण बनवण्यासाठी विद्यापीठांची परिवर्तनीय भूमिका’ हा या परिषदेचा विषय आहे. युनिव्हर्सिटी-२० परिषदेच्या माध्यमातून सर्व जी-२० देशांतील वरिष्ठ शिक्षणतज्ञ आणि शैक्षणिक नेत्यांना एकत्र आणले जाईल. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचे २०३० च्या आराखड्याला गाठायचे असेल तर विद्यापीठांनी सक्रियपणे जबाबदारी घेण्याची गरज, या भूमिकेवर चर्चा केली जाईल. तसेच यामध्ये कौशल्य घटकांवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे. पुण्यात अनेक उद्योग असून या उद्योगांना विद्यापीठांपर्यंत आणणे किंवा जोडणे हा या परिषदेचा उद्देश आहे.’’
ही तीन दिवसीय परिषद सिंबायोसिसच्या लवळे येथील कॅम्पसमध्ये १९ ते २१ जून या कालावधीत होणार आहे. परिषदेचे उद्घाटन मंगळवारी (ता. २०) सकाळी ११.१५ वाजता होणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, जी-२० मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.